Arambol Chili Farming: | Dainik Gomantak
गोवा

Arambol Chili Farming: प्रसिद्ध ‘हरमलची मिरची’ फुलतेय!

मिरची लागवड सुरू झाली मात्र अवकाळी पाऊस, धुक्‍यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Arambol Chili Farming: सध्या हरमलमध्‍ये शेतकरी आपल्या कसदार जमिनीत मिरची लागवडीसाठी व्यस्त आहेत. कित्येकांनी मिरची बिया टाकून लहान रोपे तयार केली आहेत व सध्या शिंपण तसेच अन्य कामे सुरू आहेत.

पुढील दहा ते पंधरा दिवसांत प्रत्यक्ष लागवड होईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत मिरची लागवडीसाठी शेतकरी मग्न व व्यस्त आहेत, मात्र अवकाळी पाऊस व धुक्‍यामुळे ते थोडेसे चिंताग्रस्त बनले आहेत.

पुढील तीन महिन्यांत मिरची विक्रीसाठी तयार असेल. सध्या मिरचीची लहान रोपे तयार असून ती लागवडीयोग्य बनली आहेत. नांगरणी, वाफे तयार करणे, माग ठेवणे तसेच कुंपण घालून (पोरसू) घट्ट करण्यात येत असल्याचे शेतकरी विष्णू नाईक यांनी सांगितले.

गेल्‍या 25 वर्षांपासून मी मिरचीचे उत्पादन घेत असून, दर हंगामात 60-70 किलो विक्री करायचो. शिवाय दहा-पंधरा किलो कुटुंबासाठी ठेवायचो. यंदाच्या हंगामात लागवडीसाठी जमीन व वाफे तयार असल्याने आवश्यक सुविधांसह लागवड केली जाईल, असेही नाईक म्‍हणाले.

कसदार जमिनीत रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. केवळ शेण खत व गोठ्यात तयार केलेल्या खतापासून मिरचीचे उत्पन्न घेत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम पिकांवर होत असल्याने तसेच मिरचीचा आकार लहान होत असल्याचे दिसून आले. त्याशिवाय जमिनीतील ओलसरपणा नष्ट होत असल्याने वर्षभरात खताचा वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

कित्‍येकदा ग्राहकांची होते फसवणूक

‘हरमलची मिरची’ सर्वदूर प्रसिद्ध असून मोठी मागणी आहे. विशेषतः बार्देश, डिचोली व तिसवाडी भागांतील लोक पावसाळ्यपूर्वी या मिरचीची खरेदी करतात. कित्येकदा अन्य भागांतील विक्रेते ‘हरमलची मिरची’ म्हणून ग्राहकांना फसवितात.

त्यामुळे ग्राहकांनी खात्री केल्यानंतरच मिरचीची खरेदी करावी, असे आवाहन हरमलची मिरचीविक्रेती महिला सत्यवती नाईक यांनी केले.

अवकाळी पाऊस तसेच धुके यामुळे मात्र शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. ऐन पिकांच्या हंगामात धुक्याची दुलई आल्यास वा पावसाने हजेरी लावल्यास तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हरमलच्या मिरचीला भौगोलिक सूची अर्थात जीआय मानांकन लाभले आहे. त्‍यामुळे येथील सुपीक, कसदार जमिनीचे महत्त्व ध्यानी आले. पूर्वी 30 ते 35 किलो उत्पादन करायचो,

मात्र मानांकन मिळाल्याने उत्पादन जास्त घेण्याचा प्रयत्न केला व यशही मिळाले. कष्ट घेण्याची तयारी असल्याने शेजारच्या व्यक्तीची जमीन भाडेपट्टीवर घेऊन उत्‍पादन घेत आहे. - विष्णू नाईक, शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याविरोधातील याचिका फेटाळली; 'सरकारचा अंतिम निर्णयच नाही, याचिका अकाली' खंडपीठाचे निरीक्षण

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

SCROLL FOR NEXT