200 rupees fight news Dainik Gomantak
गोवा

200 रुपयांवरून वाद, स्कुटर परत करायला आलेल्या जोडप्याला शिवीगाळ, सोन्याच्या कड्याने हल्ला; नेमकं प्रकरण काय?

Scooter Return Assault: या प्रकरणी पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा पुरुषांना अटक केली असून, एका महिलेला नोटीस बजावली आहे

Akshata Chhatre

पणजी: स्कूटर भाड्याने देण्यावरून सुरू झालेल्या एका वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) घडली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा पुरुषांना अटक केली असून, एका महिलेला नोटीस बजावली आहे.

२०० रुपयांवरून वाद, सोन्याच्या कड्याने हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जोडपे भाड्याने घेतलेली स्कूटर परत देण्यासाठी गेले असता, स्कूटर मालकाने आपल्या पत्नी आणि साथीदारासह त्यांच्याकडे अतिरिक्त २०० रुपयांची मागणी केली. जोडप्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आणि याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी मुख्य आरोपीने तक्रारदाराच्या डोक्यावर सोन्याच्या कड्याने हल्ला केला, तर तिन्ही आरोपींनी जोडप्याला शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई, नवीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या घटनेनंतर जोडप्याने पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत, नवीन 'भारतीय न्याय संहिता, २०२३' च्या कलम ११५(२), ११८(२), ३५१, ३५२ सह कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तपासानंतर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर संबंधित महिलेला 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' च्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

'असे प्रकार सहन केले जाणार नाहीत'

या घटनेवर पणजी पोलिस निरीक्षक विजयकुमार एस. चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. 'अशा प्रकारच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत,' असे सांगत त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. पणजी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: डिचोलीत स्मारकांची स्वच्छता; आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घेतला हातात झाडू

US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

SCROLL FOR NEXT