Mayem News Dainik Gomantak
गोवा

Mayem News: मयेतील कळसोत्सवाला गालबोट; उत्सव रद्द

देवीचा कळस मंदिरात : अधिकाराच्या मुद्यावरून तणाव; आधीपासून होते वाद; पोलिस बंदोबस्त

गोमन्तक डिजिटल टीम

सुरवातीचा गोंधळ आणि किरकोळ तणावानंतर सुरळीतपणे साजरा होत असतानाच मये येथील कळस उत्सवाला मंगळवारी (ता.28) मध्यरात्री वाद व तणावाचे गालबोट लागले. परिणामी कळसोत्सव अर्ध्यावरच रद्द करण्यात आला. देवीचा कळस घरोघरी फिरत असतानाच, मंगळवारी मध्यरात्री कळसोत्सवावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला.

अधिकाराच्या मुद्यावरून एका (नाईक आणि अन्य समाज) गटाने कळस गावात फिरवण्यास तीव्र आक्षेप घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटांमधील वाद वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच पोलिस बंदोबस्तात देवीचा कळस अखेर श्री महामाया मंदिरात नेण्यात आला.

देवीचा कळस सध्या मंदिरातील गर्भकुडीत बंदावस्थेत ठेवण्यात आला आहे.

मये गावात घरोघरी भेट दिल्यानंतर येत्या शनिवारी (ता.4) श्री महामाया मंदिरात कौलोत्सव साजरा होऊन या उत्सवाची सांगता होणार होती. पण त्याआधीच हा उत्सव रद्द करण्याची वेळ आल्याने, देवीचा कळस आमच्या घरी कधी येणार, त्याची उत्सुकता लागून राहिलेल्या आणि देवीच्या कळसाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या भाविकांची मात्र घोर निराशा झाली आहे.

लोकांनी देवीचा कळस आपल्या घरी येणार म्हणून विविधप्रकारे सजावट केली होती. लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. पण आता कळसाचा वाद झाल्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लहान मुले तर हिरमुसली आहेत. लोकांमध्ये नाराजीही दिसून येत आहे.

अखेर झाली होती सुरवात

समस्त भाविकांना उत्कंठा लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला शुक्रवारपासून (ता.24) प्रारंभ झाला होता. मात्र, मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ आणि वातावरण काहीसे तणावग्रस्त बनले होते. तरीदेखील प्रशासनाच्या सूचनेनुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सवाला सुरवात करण्यात आली होती.

उत्सवाची पार्श्वभूमी अशी...

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून 2019 साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकाकडून निलंबित करण्यात आले होते. 2020 सालीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव निलंबित करण्यात आला होता.

मात्र, नंतर न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर त्यावर्षी एकाच दिवशी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता. 2021 पासून गेल्या दोन वर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता.

दोन तासांहून अधिक वेळ वाद

जांभूळभाट-मये येथे कळस घरोघरी फिरत असताना, रात्री उशिरा त्याठिकाणी तणाव निर्माण झाला. मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेल्या नाईक गावकर आणि अन्य समाजातील बायका-मुले मिळून शेकडो लोक त्याठिकाणी जमा झाले. त्यांनी देवस्थान समितीला अर्थातच परब समाजाला कळसोत्सवात भाग घेण्यास विरोध केला.

यावरून वाद आणि तणाव निर्माण झाला. सुमारे दोन तासांहून अधिक वेळ वाद सुरू होता. तोपर्यंत देवीचा कळस मोडाच्या माथ्यावरच होता. अखेर प्रशासनाच्या आदेशानुसार कळस मंदिरात नेण्यात आला. तत्पूर्वी दुपारीही याच मुद्यावरून गावळान भागातही वाद निर्माण झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT