Bridge  Dainik Gomantak
गोवा

अर्धफोंड पूल अडीच महिन्यांनंतर अवजड वाहनांसाठी खुला

काणकोण-कारवार मार्गावरील अर्धफोंड पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरल्यानंतर पूलावरून सुरू असलेली वाहतूक थांबवण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

काणकोण: मागील अडीच महिन्यांपासून अवजड वाहनांसाठी बंद असलेला काणकोण-कारवार मार्गावरील अर्धफोंड पूल अखेर 18 मार्च पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

काणकोण-कारवार मार्गावरील अर्धफोंड पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरल्यानंतर पूलावरून सुरू असलेली वाहतूक थांबवण्यात आली होती. पुलाच्या दुरुस्तीसाठी काणकोणच्या (Canacona) महामार्ग विभागाचे तत्कालीन साहाय्यक अभियंता सुभाष पागी यांनी आराखडा तसेच प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून घेतले होते. जानेवारीमध्ये कामाला सुरुवात झाली. पुलाची दुरुस्ती करण्यासाठी या मार्गावरील अवजड वाहने, प्रवासी वाहने, स्कूल बसेस (Bus) यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

पहिल्यांदा पुलाच्या एका बाजूचे काम सुरू करण्यात आले. पुलावरून 2009 मध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला होता. शिवाय गुळे ते माशेपर्यंतचा बगलरस्ता तयार होण्याच्या आधी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचा भार या पुलाने (Bridge) पेलला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT