Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Electricity Problem: ठाणेत ‘इन्सुलेटर्स कव्हर’ वीजवाहिनी घालण्याच्या कामाला मंजुरी

Electricity Problem: 7 कोटी 50 लाखांचा खर्च दोन महिन्यांत काम होणार पूर्ण

दैनिक गोमन्तक

Electricity Problem: सत्तरी तालुक्यातील ठाणेसारख्या ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. त्यामुळे याचा विचार करून पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी नवीन वीजवाहिनी घालण्याच्या कामाला मंजुरी मिळवून दिली आहे. यासाठी ‘इन्सुलेटर्स कव्हर कंडक्टर’ असलेल्या नवतंत्रज्ञानयुक्त वीजवाहिन्या घातल्या जाणार आहेत.

ही नवीन पद्धत असून तंत्रज्ञानाचा वापर करून वीजवाहिनी घालण्यात येत आहे. ही वाहिनी सहजासहजी खराब होत नाही.

यासंबंधी माहिती अशी की, वाळपई ते ठाणे पंचायत क्षेत्रात सध्या वीजखांब घालण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे. एकूण वाळपई ते ठाणेदरम्यान ४५० नवीन खांब घालण्यात येत आहेत. यासाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही वीजवाहिनी ११ केव्ही ठाणे सबस्टेशनवर घालण्यात येत आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

आता या नवीन वीजवाहिनीमुळे वाळपईबरोबर कोपार्डे, हेदोडे, पाली, नानेली, ठाणे-हिवरे व इतर भागात त्याचा मोठा फायदा होणार आहे. या कामामुळे नागिरकांनी समाधान व्यक्त केले असून स्थानिक आमदार डाॅ. दिव्या राणे यांचे आभार मानले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आज हे शक्य होत आहे. सत्तरीचा विकास करताना ग्रामीण भागात चांगल्याप्रकारे साधनसुविधा पुरविण्याकडे त्यांचे प्रयत्न असतात.

ठाणे भागात काही वेळेला दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे आमच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या संकल्पनेतूनच आज ही नवीन पद्धतीची वीजवाहिनी घालण्याच्या कामाला सुरवात झालेली आहे. या नवीन वाहिनीमुळे येणाऱ्या दिवसांत विजेची समस्या सुटणार आहे. या कामामुळे अनेकांचा वेळ तसेच पैसा वाचणार आहे.
- सरिता गावकर, सरपंच, ठाणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT