फातोर्डा : मडगाव नगरपालिकेत मानव संसाधन ख्यातातर्फे भरती करण्यात आलेल्या पाच डाटा ऑपरेटर्सची भरती नगरपालिकेतील नागरसेवकांना विश्वासात न घेता करण्यात आली आहे. या मध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी केला आहे. या प्रकरणात नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्यधिकारी यांनी मडगाव तसेच फातोर्डा आमदारांच्या सांगण्यानुसार हा प्रकार केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. ( Appointment scam of data operators in Madgaon municipality; Allegation of corporator Ghanshyam Shirodkar )
पुढे बोलताना ते म्हणाले की, हा नोकरी संधर्भात मोठा घोटाळा आहे. मडगाव नगरपालिका क्षेत्रात अनेक बेकार युवक आणि युवती असून हा त्यांच्यावर एका प्रकारे अन्याय केल्यासारखे आहे. मानव संसाधन विभाग खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या या पाच डाटा ऑपरेटर्सना महिन्याला 27 हजार रुपये देण्यात येणार आहे. हा करार सहा महिन्यासाठी असला तरी या पुढे कोणत्याही कारणाने त्यांना बढती देण्याची शक्यता आहे. या डाटा ऑपरेटर्सना नियुक्ती केल्याचे पत्रही त्यांना पाठविण्यात आले आहे याची प्रत मुख्यधिकारी रोहित कदम यांनी आपल्याला दाखविली असल्याचे ते म्हणाले.
मात्र नागरपालिकेच्या कुठल्याही बैठकीत या विषयी चर्चा करण्यात आली नसल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. या डाटा ऑपरेटर्सची नियुक्ती मडगाव नगरपालिकेच्या बैठकीत चर्चा होऊन करायला हवी होती मात्र तसे नसताना सर्व काही बाहेरच्या बाहेर आटोपण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीला आपली हरकत असून गरज पडल्यास न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मडगाव नगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे नाहीत अशा प्रकारच्या नियुक्तीने मडगाव नगरपालीलेवर आणखी बोजा वाढणार. मडगाव नगरपालिकेतील प्रभागातील गटारे आणि नाले सफाईचे काम 50 टक्के सुद्धा पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव आणि फातोर्डाचे आमदार आपल्याला हव्या त्या प्रमाणे नगरपालिकेतील कामगार उपलब्ध करून घेत असल्याने मडगावात गटारे तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.