Goa Pradesh Congress (Goa Politics) Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसच्या 8 गट अध्यक्षांची यादी जाहीर

प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी जाहिर केली यादी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : प्रदेश काँग्रेस समितीने विधानसभानिहाय आठ गटसमितींच्या अध्यक्षांची निवड मंगळवारी जाहीर केली. उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी आठ अध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये पेडण्यासाठी रुद्रेश देशप्रभू, वाळपईमध्ये कृष्णा नेने, पर्येत रमेश शिरोडकर, कुंभारजुवेमध्ये विशाल वळवईकर, वास्कोत मेल्विन फर्नांडिस, सांगेमध्ये चंदा वेळीप, काणकोणमध्ये अबेल बोर्ग आणि सांताक्रूझमध्ये जॉन नझारेथ यांचा समावेश आहे.

देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाला सत्ता खेचून आणता आलेली नाही. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. यावरून काँग्रेस या पाचही राज्यात संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले होते. त्याप्रकारे इतर राज्यात तसे बदल केले. तसाच बदल गोव्यातही करण्यात आला असून गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे राज्य काँग्रेसचे नेतृत्व देण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे राज्य काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतर नव्या समित्या निवडल्या गेल्या होत्या. २२ गटसमित्यांचे पुनर्गठन करण्यात आले होते. परंतु काही कालावधीत त्या समित्या बरखास्त करण्यात आल्या. मंगळवारी प्रदेश काँग्रेस समितीने विधानसभानिहाय आठ गटसमितींच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली.

नव्याने जाहीर झालेल्या आठ समित्यांतील पेडणे गट समितीचे अध्यक्षपदी रद्रेश देशप्रभू, कुंभारजुवेमध्ये विशाल वळवईकर, वाळपईमध्ये कृष्णा नेने, पर्येत रमेश शिरोडकर, वास्कोत मेल्विन फर्नांडिस, सांगेमध्ये चंदा वेळीप, काणकोणमध्ये अबेल बोर्ग आणि सांताक्रूझमध्ये जॉन नझारेथ यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT