Babush and Jennifer Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: मंत्री बाबुश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांचा मडगाव कोर्टात अर्ज

पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणात केली 'ही' मागणी

Akshay Nirmale

Panaji Police Station Attack Case: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या पणजी पोलीस स्थानक तोडफोड प्रकरणी आता मोन्सेरात दाम्पत्याने कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

हे गाजलेले प्रकरण 2008 सालचे आहे. या प्रकरणात हजर राहण्यापासून कामयची सूट मिळावी, यासाठी महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी मडगाव कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

सुनावणीदरम्यान, डीवायएसपी सुदेश नाईक यांनी सीसीपीचे माजी महापौर उदय मडकईकर आणि कॅरोलिना यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या आठ जणांची ओळख पटवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे.

मोन्सेरात यांच्या काही समर्थकांना पणजी पोलीसांनी अटक केल्यावर त्यांना सोडविण्याची मागणी करण्यासाठीं मोन्सेरात आणि त्यांचे समर्थक पोलीस स्थानकावर चाल करुन आले होते.

त्यावेळी या जमावाने पोलिसांवर हल्ला करून स्थानकाची मोडतोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हा हल्ला झाला त्यावेळी नाईक हे पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक होते.

बाबूश मोन्सेरात हे वारंवार पणजी पोलीसांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याने पोलीसांचे त्यांच्याशी असलेले संबंध ताणले गेले होते अशी या प्रकरणात यापुर्वी दिली गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT