Margao Urban Bank Dainik Gomantak
गोवा

Margao Urban Bank ठेवीसंदर्भात 31 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Margao Urban Bank सर्व शाखांचे मिळून 810 लॉकर्स आहेत

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: बंद करण्यात आलेल्या मडगाव अर्बन (Margao Urban Bank) सहकारी बॅंकेच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरु असून ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज करण्याची व कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. संबंधितांनी ठेवी, लॉकर्ससंदर्भात अर्ज करावे, असे लिक्विडेटरतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

ही प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू झाली असली तरी बॅंकेच्या केवळ 10 टक्के ठेवीदारांनी अर्ज केल्याचे कळते. या बॅंकेचे सर्व शाखांचे मिळून ठेवीदारांची संख्या 56636 अशी आहे. मात्र अजूनपर्यंत केवळ 5053 ठेवीदारांनीच अर्ज केल्याची माहिती लिक्विडेटर एस व्ही. नाईक यांनी नियुक्त केलेले अधिकारी किशोर आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

या बॅंकेत सर्व शाखांचे मिळून 810 लॉकर्स आहेत. त्यातील केवळ186 जणांनी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत लॉकर्स बंद करण्यासाठी ठेवीदारांकडून कागदपत्रे सादर केली नाहीत, तर मग भाडेपट्टीवर घेतलेल्या बॅंकेतील शाखांतील लॉकर पंचनामा करून उघडले जातील, त्यातील वस्तू बॅंकेच्या आके येथील मुख्य कचेरीत सुरक्षिततेत ठेवल्या जातील, अशी माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT