Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायती निवडणूकीच्या रिंगणात आपचा उमेदवार

जिल्हा पंचायतीच्या दवर्ली, रेईश मागूश आणि कुठ्ठाळी मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: आपच्या जॉन डी'सा यांनी कुठ्ठाळी जिल्हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. जिल्हा पंचायतीच्या दवर्ली, रेईश मागूश आणि कुठ्ठाळी मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, आरजी पाठोपाठ आता भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

(Goa Zilla Panchayat Election)

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. उत्तर गोव्यातील रेईस-मागुश जिल्हा पंचायतीच्या जागेसाठी पिळर्ण येथील संदीप काशिनाथ बांदोडकर तर दक्षिण गोव्यातील दवर्ली जिल्हा पंचायतीसाठी परेश पांडुरंग नाईक यांच्या नावांचा समावेश आहे.

आरजी, आपसह इतर राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात

आरजी, आपसह इतर राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवाय काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार, असे संकेत आहेत. दरम्यान उत्तरेतील रेईस-मागुश आणि दक्षिणेतील दवर्ली या जागा आम्ही यापूर्वी जिंकल्या होत्या.

कुठ्ठाळीची जागा अपक्ष आमदार अंतोनियो वाझ यांनी जिंकली होती. त्यामुळे ही जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडली असून त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आताही आम्ही या तीनही जागा जिंकू असा मला विश्‍वास आहे, असं गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर

परेश नाईक पंच सदस्य असून गेली सहा वर्षे ते उपसरपंच पद सांभाळत आहेत. तसेच भाजपाच्या नावेली मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तर संदीप बांदोडकर गेली चार वेळा पंच सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी सरपंचपदीही काम केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने दवर्ली येथून लिओनिको रायकर आणि कुठ्ठाळी येथून वॉलेंट बारबोझा यांना तर रेईश मागूश येथून प्रगती पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT