Electricity Bill Dainik Gomantak
गोवा

लाईट बिल भरण्यासाठी आता चोवीस तास सुविधा, गोव्यात चार ठिकाणी ATPAA मशीन उपलब्ध

मशीन्सच्या माध्यमातून ग्राहकांना चोवीस केव्हाही वीज बिल भरता येणार आहे.

Pramod Yadav

Any time payment machines installed by goa electricity dept: वीज बिलाचा भरणा करण्यासाठी वीज खात्याच्या वतीने चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यात चार ठिकाणी वीज खात्याने मशीन्स उलब्ध केल्या आहेत. या मशीन्सच्या माध्यमातून ग्राहकांना चोवीस केव्हाही वीज बिल भरता येणार आहे.

म्हापसा, कळंगुट, पणजी आणि मडगाव येथे या मशीन्स उभारण्यात आल्या आहे. म्हापसा येथील वीज कार्यालयाच्या तळमजल्यावर वीज खात्याने एनी टाईम पेमेंट मशीन (ATPAA) उभारले. त्यावेळी याबाबत माहिती देण्यात आली.

वीज भरणा करण्यासाठी येणाऱ्या वयस्कर नागरिकांना रांगेत उभं राहावे लागते. वृद्ध नागरिकांना या मशीनमुळे वीज बिल भरणा सुलभ होणार आहे. तसेच, चोवीस तास सुविधा असल्याने आपल्या वेळेनुसार नागरिकांना पैसे भरता येईल अशी माहिती मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.

मशीन हातळण्यासाठी मशीन जवळ कार्यालयाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी ग्राहकांना मशीन कसे हाताळायचे याची माहिती देतील. असेही फर्नांडिस यांनी माहिती दिली.

म्हापसा, कळंगुट, पणजी आणि मडगाव येथे मशीन सुविधा देण्यात आल्याने येथील ग्राहकांना त्यांच्यावेळेत वीज भरणा करणे सुलभ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT