Subhash Velingkar Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: दिलासा! सुभाष वेलिंगकरांची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

Saint Francis Xavier Controversy: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकरांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Manish Jadhav

Goa News: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकरांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वेलिंगकर यांनी बीएनएसएसच्या कलम 35 अन्वये नोटीसचे पालन केल्याने उच्च न्यायालयाने सर्व हस्तक्षेप अर्जासह सुभाष वेलिंगकरांची याचिका निकाली काढली. दरम्यान, पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर वेलिंगकरांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बॉस्को रॉबर्ट्स यांनी वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. एवढ्यावरच न थांबता वेलिंगकरांना पोलिसांसमक्ष हजर राहण्याचे आदेश देखील त्यांनी दिले होते. त्यानंतर न्यायालयीन आदेशाचे पालन करत वेलिंगकरांनी डिचोली पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. डिचोली पोलिसांकडून (Bicholim Police) वेलिंगकरांची दोन वेळा कसून चौकशी करण्यात आली होती.

वेलिंगकर प्रकरणात युक्तिवाद!

दरम्यान, वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामीनावर पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. सुनावणीदरम्यान वेलिंगकरांच्या वकिलाने, 'वेलिंगकर तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करु शकत नाहीत. लोकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे असे म्हटले होते. त्यांनी काही गुन्हा केला नाही तर डीएनए टेस्ट करावी ही केवळ मागणी असल्याचे देखील ते पुढे म्हणाले होते.

त्यावर प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी 'वेलिंगकरांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन गोव्यातील सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे,' असा युक्तिवाद केला होता. तसेच, डिचोली पोलिसांनीही वेलिंगकरांना जामीन नाकारण्यात यावा असा युक्तिवाद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT