Babu Ajgaonkar And Anthony Barbosa Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar: बाबू आजगावकरांची 'लुडबूड' खपवून घेणार नाही; अँथनी बार्बोझा यांचा इशारा

बाबूंनी मडगाव आणि पेडण्यापुरतेच राजकारण सीमित ठेवावे

गोमन्तक डिजिटल टीम

Babu Ajgaonkar: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपल्याला दवर्लीत प्रचारासाठी पाठविले होते, असे बाबू आजगावकर सांगतात. पण बेकायदेशीर घरांना क्रमांक देण्यासाठी त्यांना पाठविले होते का, असा सवाल भाजपचे एसटी समाजाचे नेते अँथनी बार्बोझा यांनी आज केला.

दवर्लीचे सरपंच हर्क्युलान नियासो यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवारी बार्बोझा यांनी दवर्ली पंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बार्बोझा म्हणाले, ज्या जागेवर ही घरे बांधली आहेत, ती जागा ‘१८-क’ खाली अधिसूचित असून अशा जागेचा फक्त शेतीसाठी वापर करता येतो. अशा जागेत ही घरे बांधलीच कशी आणि या बेकायदेशीर घरांना क्रमांक द्या, असा आग्रह आजगावकर कसा करू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

दवर्ली पंचायतीत बहुतेक पंच सदस्य एसटी समाजाचे असून त्यांना कुणी धमकावल्यास इतर एसटी बांधव गप्प राहाणार नाहीत. बाबू आजगावकर मोठे नेते असतीलही; पण त्यांनी मडगाव आणि पेडण्यापुरतेच राजकारण सीमित ठेवावे. दवर्लीत काय करायचे आणि कोणते निर्णय घ्यायचे ते आमचे आम्ही पाहून घेऊ. आजगावकरांची लुडबूड आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा बार्बोझा यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT