Death Body  Dainik Gomantak
गोवा

Ponda : बेपर्वाईचा आणखी एक बळी; सेफ्टी टॅंकमध्ये विजेच्या धक्क्याने 19 वर्षीय युवक ठार

फोंड्यातील पालिका इमारतीच्या परिसरात घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील बेपर्वा मलनिस्सारण कामाने आणखी एका युवकाचा बळी गेला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मे महिन्यात एका कामगाराचे मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमध्ये बुडून निधन झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता फोंड्यात ही घटना समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पालिका इमारतीच्या समोरील मुख्य रस्त्यावर मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमध्ये कामगार उतरला होता. यावेळी चेंबरमध्ये त्या ठिकाणी कामगाराचा विजेशी संपर्क आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विजेच्या धक्क्याने तो मरण पावला असावा, असे सांगण्यात आले. आलमगीर जुल्लर रेहमान (19, सध्या रा. बांदोडा, मुळ रा. पश्‍चिम बंगाल) असे मृत युवकाचे नाव आहे.

दरम्यान, आलमगीर याला विजेच्या धक्का लागल्याचे लक्षात येताच त्याला तत्काळ फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल दाखल करण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, हा विजेचा धक्का की अन्य याबाबतीत शवचिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आलेला नाही, त्यामुळे मयताचा व्हिसेरा अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी फोंडा पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

कंत्राटदाराची बेपर्वाई

12 मे रोजी मलनिस्सारणाच्या कपिलेश्‍वरी येथील चेंबरचे काम सुरू असताना अचानक या चेंबरमध्ये पाणी शिरल्याने त्यात महाराष्ट्रातील शुभम भोपळे (21) याचा पाण्यात बुडून मरण पावला होता. या प्रकल्पाच्या कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे हा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर पोलिस तक्रारही झाली होती. आताही आलमगीरचा मृत्यू हा या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या अव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Narvekar Marathi Controversy: शोक-पस्तावावर खुलासा..!

Football Stars Legs Insurance: मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

Goa IIT Campus: मेळावलीतील जमीन पुन्हा ताब्यात घेणार; 'आयआयटी गोवा' स्थलांतर प्रकल्पावर सरकारकडून पडदा

SCROLL FOR NEXT