South Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

South Goa: वीज खात्याकडून दुसऱ्यांदा निर्णय रद्द, दक्षिण गोव्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

यापूर्वी देखील शिगमोत्सवानिमित्त वीज खात्याने निर्णय मागे घेतला होता.

Pramod Yadav

 दक्षिण गोव्यात येत्या रविवारी (दि.30 एप्रिल) आठ तास वीज पुरवठा वार्षिंक दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, वीज खात्याने हा निर्णय रद्द केला आहे.

यापूर्वी देखील शिगमोत्सवानिमित्त वीज खात्याने निर्णय मागे घेतला होता, त्यानंतर 30 एप्रिल रोजी निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. दरम्यान, यावेळी देखील हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 केव्ही सबस्टेशन, कुंक्कळी येथील 220 केव्ही आणि वेर्णा येथील 110 केव्ही सबस्टेशनची दुरूस्ती आणि देखभाल संबधित काम केले जाणार आहे. असे वीज खात्याने पत्रकात म्हटले होते. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार होता.

दरम्यान, वीज खात्याने तुर्तास हा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत पुढील निर्णयाची माहिती नंतर दिली जाईल असे खात्याने म्हटले आहे.

यापूर्वी  11 मार्च रोजी दक्षिण गोव्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित राहणार होता. दरम्यान, शिगमोत्सवामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यानंतर येत्या रविवारी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे खात्याने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

BRICS India: सेतू बांधला, पण 'किंतु-परंतु' कायम! ब्रिक्समध्ये भारताचा राजनैतिक प्रभाव वाढला; मात्र चीन-रशियासोबतची प्रचंड व्यापारतूट ठरतेय मोठे आव्हान

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

SCROLL FOR NEXT