South Goa 
गोवा

South Goa: वार्षिक देखभाल ; 'या' दिवशी अख्ख्या दक्षिण गोव्यात राहणार वीज पुरवठा बंद

वीज खात्याच्या वतीने नियोजित वार्षिक देखभाल केली जाणार आहे.

Pramod Yadav

Power Shut Down In South Goa: गोवा वीज खात्याच्या वतीने दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी नियोजित वार्षिक देखभाल केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खात्याच्या वतीने नोटीस देखील प्रसिद्ध केली असून, देखभाल दुरूस्तीच्या काळात कोणते क्षेत्र प्रभावित होणार याची माहिती दिली आहे. तसेच, दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन केले आहे.

वीज खात्याच्या वतीने नियोजित वार्षिक देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र, कुंक्कळी येथील 220 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र आणि वेर्णा येथील 110 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र शनिवार (दि. 11 मार्च) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 07.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत संपूर्ण दक्षिण गोव्यात वीज पुरवठा बंद राहणार आहे. फोंडा तालुका मात्र यासाठी अपवाद असेल असे खात्याने म्हटले आहे.

केवळ देखभालीच्या कामासाठी ही उपकेंद्र बंद राहणार असल्याचे खात्याने म्हटले आहे.

कोणत्या क्षेत्रात बंद राहणार वीज पुरवठा

काणकोण, सासष्टी, सांगे, केंपे, मुरगाव या पाच तालुक्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर, धारबांदोडा तालुक्याच्या काही भागातील वीज पुरवठा बंद राहील. दरम्यान, फोंडा तालुका वीज कपातीपासून सुरक्षित असला तरी तालुक्यातील पंचवाडी येथे वीज पुरवठा खंडित राहणार आहे.

शनिवारी 11 मार्च रोजी 07.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत बंद राहणाऱ्या वीज पुरवठ्याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे वीज खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT