Ravi Naik News Updates Dainik Gomantak
गोवा

कृषी मंत्र्याच्या घोषणेमुळे शहराचा ‘कायापालट’ होण्याची शक्यता

मास्टर प्लॅनचे फोंड्यात ‘स्वागत’

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक यांनी मास्टर प्लॅनची जी घोषणा केली, तिचे फोंडावासियांकडून स्वागत होत आहे. गेली दहा वर्षे फोंडा शहर उपेक्षित शहर म्हणून गणले जात आहे. 2007 ते 2012 पर्यंत म्हणजे रवी नाईक गृहमंत्री असताना या शहराच्या विकासाचा वेग गगनाला भिडला होता. पण 2012 साली रवींचा पराभव झाल्यानंतर या शहराकडे दुर्लक्ष करण्यात आले.

(announcement of the Minister of Agriculture is likely to 'transform' the city)

मध्यवर्ती ठिकाणी फोंडा असल्यामुळे या शहरात लोकांची सारखी ये-जा सुरू असते. त्यामुळेच या शहराला विकासाची नितांत आवश्यकता आहे. पण सुरुवातीची पाच वर्षे लवू मामलेदार हे मगोपचे आमदार असल्यामुळे व नंतरची पाच वर्षे रवी नाईक हे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे या शहराकडे सरकाराकडून दुर्लक्ष झाले. पण आता रवी परत निवडून येऊन कृषिमंत्री झाल्यामुळे या शहराच्या विकासाचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि रवींनी मास्टर प्लॅनची घोषणा केल्यामुळे ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची संभावना अधोरेखित होत आहे.

शहराच्या मधोमध अधूनमधून खड्डे खणण्याचे कामही सुरू असते. कधी केबल वायर टाकण्याकरिता किंवा कधी गॅसवाहिनीकरिता हे खड्डे खणले जात असल्याचे सांगितले जाते. त्यावरही कृषिमंत्र्यांना लक्ष द्यावे लागेल. रवीने आपल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बगल रस्ते सुरू केल्यामुळे फोंड्यातील वाहतुकीला थोडाफार आवर आला असला तरी आता वाहने वाढल्यामुळे पुन्हा वाहतूक नियंत्रणात आणणे कठीण होऊ लागले आहे.

प्लॅनची आवश्‍यकता

मास्टर प्लॅन घोषणेचे स्वागत केले पाहिजे. दहावर्षे फोंडा शहराकडे कुणीच गांभीर्याने बघितलेले नाही. फोंडा शहराचा मास्टरप्लॅन मूर्त स्वरूपात आणून फोंडा शहराचा कायापालट करावा, ते लवकरात लवकर आपल्या ‘मिशन’ मध्ये ‘कामयाब’ होतील, हीच अपेक्षा आहे, असे महादेव खानोलकर (माजी उपनगराध्यक्ष) यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT