Garbage Problem  Dainik Gomantak
गोवा

मडगावच्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी नवीन प्रकल्पांची घोषणा

दिगंबर कामत यांनी शुक्रवारी मडगावात घेतली बैठक

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेने शहरातील कचरा समस्येवर मात करण्यासाठी आणखी दोन 5 टीपीडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी वर्क आर्डर जारी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पालिकेला पालिका प्रशासन संचालकांकडून तसेच ‘सुडा’कडून हिरवा कंदील मिळाला आहे.मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी शुक्रवारी मडगावातील विविध कामांच्या प्रगतीबाबत जी आढावा बैठक घेतली होती, त्यात हे संकेत मिळाले. ‘सुडा’चे ज्येष्‍ठ प्रकल्प अभियंता मुजावर यांनी पालिकेला सदर दोन प्रकल्पांबाबत पुढे जाण्यास सांगण्यात आल्याकडे लक्ष वेधले.

या बैठकीस नगराध्यक्ष लिंडन परेरा हेही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, पालिकेने यापूर्वीच एसजीपीडीए बाजारालगत असा एक प्लांट उभारलेला असून त्याच्या समाधानकारक अहवालाची प्रतिक्षा होती. आता पालिका प्रशासन व ‘सुडा’कडून परवानगी मिळाल्याने घाऊक मासळी बाजारात एक व एसजीपीडीएच्या पार्किंग जागेलगत दुसरा प्लांट उभारण्याबाबत वर्क आर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिकेच्या सोनसोडो येथील कचरा राशीला लागलेली आग व त्यानंतर सोनसोडो प्रकल्पाची कोसळलेली भिंत यामुळे पालिकेची कोंडी झाली होती. परिणामी त्या प्रकल्पातील ओला कचरा साळगाव प्रकल्पात नेण्याची विनंती घनकचरा महामंडळाला केली होती. दुसरीकडे सोनसोडो प्रकल्पाबाबत कोणताच तोडगा निघत नसल्यानेही पेच निर्माण झाला होता. आता या दोन प्रकल्पांच्या मार्गातील अडसर दूर झाल्याने ते काम त्वरित पूर्ण होईल याकडे पालिकेने लक्ष द्यावे अशी सूचना कामत यांनी सदर बैठकीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT