Goa Loud Music Issue Canva
गोवा

Vagator: वागातोर येथील दोन क्लबविरोधात कारवाईचा बडगा! 'ध्वनीमर्यादा' ओलांडल्याबद्दल मालकांवर गुन्हा दाखल

Vagator Club Loud Music: हणजूण पोलिसांनी वागातोर येथील दोन क्लबच्या मालकांवर/व्यवस्थापकांवर परवानगी मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Sameer Panditrao

Vagator Club owners loud music case

म्हापसा: हणजूण पोलिसांनी वागातोर येथील दोन क्लबच्या मालकांवर/व्यवस्थापकांवर परवानगी मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. ही कारवाई गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या तक्रारीनंतर करण्यात आली.

माहितीनुसार, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी ‘सॅलुड आणि हिल टॉप’ या वागाातोरमधील दोन क्लबविरुद्ध मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या.

पहिल्या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी ११ ते जानेवारी १ २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सॅलुड यांनी परवानगी असलेल्या मर्यादेपक्षा जास्त मोठ्या आवाजात संगीत वाजवले. यावेळी ध्वनी मीटरवर ६५.७ डीबी नोंदवले गेले, जे ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होते.

दुसऱ्या घटनेत, हिल टॉपच्या मालक/व्यवस्थापकावर २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११ ते २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ आणि ६ जानेवारी २०२५ रोजी, रात्री ११ ते ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ या वेळेत त्यांच्या आवारात मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. ध्वनी मीटरवरील ६८.२ डेसिबल आणि ७९.७ डेसिबल नोंदवले गेले होते, जे ध्वनी नियमांचे उल्लंघन होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT