Anjunem Dam at Kerim - Sattari (Goa) Dashrath Morajkar / Gomantak
गोवा

Dams In Goa: अंजुणे धरणानेही गाठला तळ, चिंता वाढली; केवळ तीनच टक्के पाणी

केरी परिसरात तीव्र टंचाई भासण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात मॉन्सून जाहीर केला असला, तरी अजूनही सक्रिय झालेला नाही आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून चार दिवस मॉन्सून कमजोर राहणार आहे. यातच राज्यातल्या धरणांनी तळ गाठल्याने पाणी टंचाई तीव्र बनताना दिसत आहे. प्रामुख्याने अंजुणे आणि पंचवाडी परिसरात ही पाणी टंचाई त्रासदायक बनणार अशी चिन्हे आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आणि प्रशांत महासागरात सक्रिय असलेला अल निनो यामुळे यंदाचा मॉन्सून कमजोर असेल अशी शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत राज्यातील पंचवाडी, अंजुणे आणि साळावली धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे.

प्रामुख्याने अंजुणे धरण परिसरातील पिण्याच्या पाणी प्रकल्पांवर धरणातील कमी झालेल्या पाण्याचा परिणाम झालेला दिसत आहे. ही पाणी टंचाई पुढील आठवडाभरात अधिक तीव्र बनणार आहे. सध्या वाळपई - सत्तरी भागातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा अनियमित असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

धरणांतील पाणीसाठा

धरण शिल्लक पाणी (टक्केवारीत)

साळावली २१

अंजुणे ३

चापोली ४१

आमठाणे ४१

पंचवाडी कोरडे

गावणे ३६

उपाययोजनेचे प्रयत्न

राज्यात सध्या पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध आहे. खांडेपार, ओपा आणि म्हादईमध्ये पुरेसे पाणी आहे. मात्र, अंजुने धरणाचा पाण्याचा साठा कमालीचा कमी झालेला आहे. तो केवळ ३ टक्केच शिल्लक आहे. यावर पुढील काही दिवस पाणी प्रकल्प चालवता येतील. तिळारी, साळावली, आमठाणे आणि चापोली धरणात जूनपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे. पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

- प्रमोद बदामी, मुख्य अभियंते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT