Anger everywhere in bicholim due to burning of Narkasur Dainik Gomantak
गोवा

ऐन दिवाळीच्या तोंडावर नरकासूर जाळला बोर्डे-डिचोलीत सर्वत्र संताप

तयार नरकासूर जाळल्याने वडेश्वर बॉयज समोर मोठा पेच निर्माण झाला आहे

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्वत्र नरकासूर (Narkasur) करण्याची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर नरकासूर जाळण्याचा संतापजनक प्रकार डिचोलीत घडला आहे. बोर्डे येथील वडेश्वर बॉयजने तयार केलेल्या नरकासूर प्रतिमेला कोणीतरी अज्ञातांनी आग लावण्याची घटना घडली आहे. या कृत्यामुळे डिचोली (Bicholim) भागात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याप्रकरणी वडेश्वर बॉयजतर्फे डिचोली पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. ही आग कोणी आणि कशासाठी लावली, त्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र कोणीतरी जाणूनबुजून हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंबंधीची माहिती अशी, की यंदाही बोर्डे वडाजवळ वडेश्वर बॉयज मंडळाच्या बाळगोपाळांनी रात्री जागून आकर्षक नरकासूर प्रतिमा उभी केली होती. नरकासुराचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले होते. या कामावर हजारो रुपये खर्चही करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्री कोणीतरी या नरकासुराला आग लावली. काल शनिवारी सकाळी नरकासूर जळालेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी अर्धाअधिक नरकासूर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या प्रकाराबद्दल मंडळाने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नव्याने नरकासूर

तयार नरकासूर जाळल्याने वडेश्वर बॉयज समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता पुन्हा नरकासूर प्रतिमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या कार्यकर्त्यांकडून नरकासूर करण्याची लगबग सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT