Anganwadi Workers Protest Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ सात अंगणवाडी शिक्षिकांचे पणजीत धरणे

न्याय न मिळाल्यास उपोषणाचा अंगणवाडी शिक्षिकांचा सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : सरकारविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्‍याचे कारण देऊन कामावरून कमी केलेल्‍या सात शिक्षिकांनी गुरुवार दि. 26 मे पासून येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. याबाबत ‘गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्स’ या संघटनेचे नेते ॲड.हृदयनाथ शिरोडकर म्‍हणाले की, काही महिन्‍यांपूर्वी राज्‍यातील अंगणवाडी शिक्षिकांनी आपल्‍या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते.

ॲड. शिरोडकर हे काँग्रेसचे नेते आहेत. एका राजकीय पक्षाच्‍या नादाला लागून तुम्‍ही सरकारविरुद्ध आंदोलन केल्‍याचा ठपका ठेवून महिला व बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक दीपाली नाईक यांनी आंदोलनासाठी नेमलेल्‍या समितीत सहभागी असणाऱ्या 7 शिक्षिकांना कामावरून कमी केले होते. या शिक्षिकांना न्‍याय मिळावा यासाठी आम्‍ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दोनदा भेटलो. तेव्हा त्‍यांनी न्‍याय देण्याचे आश्‍वासन दिले. पण 2 महिने उलटूनही या शिक्षिकांना न्‍याय मिळत नसल्‍याने पुन्‍हा धरणे आंदोलन करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सरकारने या शिक्षिकांना पुन्‍हा कामावर रूजू करून न घेतल्‍यास उपोषणाचा मार्ग अवलंबू, असा इशारा ॲड. शिरोडकर यांनी दिला.

सरकार दखल घेत नसल्याने पुन्‍हा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे विद्या नाईक यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हा विषय आम्‍ही पुन्‍हा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्‍यावेळी फाईल पुढे पाठवली आहे. पण संबंधित मंत्र्यांनी ती अडवल्‍याचे त्यांनी सांगितल्‍याचे ॲड. हृदयनाथ शिरोडकर म्‍हणाले. यासाठी आज आम्‍ही फोंडा येथे मंत्री विश्‍वजीत राणे यांची भेट घेण्यास गेलो. पण त्यांनी आम्‍हाला भेट नाकारली,असेही अॅड. शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT