Anganwadi rent issue in Goa will be resolved soon Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील अंगणवाडी भाडेप्रश्‍न लवकरच सोडवणार'

विश्‍वजीत राणे: मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आधुनिक अंगणवाडी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील अनेक अंगणवाड्यांची स्थिती खूपच बिकट आहे. या अंगणवाड्या इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासंदर्भात जागा शोधण्याचा विचार सुरू आहे. खासगी जागांमधील अंगणवाड्यांचे भाडे वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचाही प्रयत्न आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

महिला व बाल विकास खात्यातर्फे ‘कॉल सेंटर’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक आज मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आल्तिनो - पणजी येथील वनभवन सभागृहात घेतली. बैठकीविषयी माहिती देताना राणे म्हणाले की, अंगणवाडीतील मुलांचे पालक तसेच महिलांना समुपदेशन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातील अनेक अंगणवाड्या खासगी जागेत आहेत. केंद्र सरकारची ही योजना असल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या निधीमधून या अंगणवाड्यांना वाढीव भाडे देणे शक्य नाही. जागामालकही भाडेपट्टीवर अंगणवाड्यांसाठी जागा देत नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT