Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: करमळीत झाडांना आग लावण्याचे प्रकार; भागात भीती

Goa News: कुंभारजुवे मतदारसंघातील करमळी गावात खुल्या जमिनीत असलेल्या झाडांना विनाकारण आग लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: कुंभारजुवे मतदारसंघातील करमळी गावात खुल्या जमिनीत असलेल्या झाडांना विनाकारण आग लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. करमळीत अनेक ठिकाणी आग लागलेली दिसत असून त्याचे रुपतांतर वणव्यात होण्यापूर्वी पंचायतीकडून आग लावणाऱ्या व्यक्तींना सक्त ताकीद देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

गेल्या वर्षी सत्तरीत असेच आग लावण्याचे प्रकार घडले होते, त्याचे रुपांतर वणव्यात झाल्यानंतर म्हादई अभयारण्यात भीषण लागली होती. असाच प्रकार करमळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काही जण आपल्या आनंदासाठी ही आग लावतात आणि पळून जातात. याचा दुष्परिणाम शेजारच्या घरांवर होतो, कारण आगीतून उठणारी राख घरांमध्ये जाते. त्याशिवाय हानिकारक धुरामुळे श्वसनाचे रुग्णांना त्रास होतो, तसेच प्राणी आणि पक्षांना देखील ही आग घातक आहे.

कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याने आम्ही लोकांना सक्त ताकीद दिली होती. आता पुन्हा झाडांना लाग लावण्याचे प्रकार आमच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यामुळे असे करण्यापासून लोकांनी टाळावे. पंचायतीची यावर नजर असून करमळी परिसरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरा लावणार आहे. आग लावताना एखादी व्यक्ती आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- कुष्टा सालेलकर, सरपंच, करमळी पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT