Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगाव रेल्वे स्थानकाजवळ बालिकेचे अपहरण; महिलेला अटक

Margao News: मडगाव रेल्वे स्थानकाजवळ फुटपाथवर झोपलेल्या दाम्पत्याच्या एका महिन्याच्या बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Margao News: मडगाव रेल्वे स्थानकाजवळ फुटपाथवर झोपलेल्या दाम्पत्याच्या एका महिन्याच्या बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने फुटपाथवर आपला संसार थाटला होता. त्या जोडप्याला संशयित कधी कधी खायला आणून देत असे.

याच ओळखीतून त्या महिलेने बालिकेच्या आईला आपण तुला चार लाख रुपये देते, तुझी मुलगी मला दे, अशी गळ घातली होती. पण तिच्या आईने ही मागणी झिडकारून लावली.

दोन महिन्यांपूर्वी बालिकेची आई रात्री फुटपाथवर झोपलेली असताना नातलियाने बालिकेला उचलले व पळ काढला. पोलिस तक्रारीनंतर संशयित महिला ही आगशी येथे रहात असल्याची माहिती मिळाली.

आगशीं येथे जाऊन पाहणी केल्यानंतर ही महिला अखेर नावेली सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून अपहृत बालिका आणि तिच्या आईची रवानगी अपना घरमध्ये केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT