Crime In Goa Dainik Gomantak
गोवा

Crime In Goa: तान्हुल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न, वास्कोतील धक्कादायक प्रकार

रेल्वे पोलिसांकडून बाळाच्या पित्याला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

आईला वारंवार मिरगीचे झटके येत असल्याने लहान बाळाला सांभाळणे अशक्य झाल्याने बेल्लारी येथील एका दाम्पत्याने पोटच्या आठ महिन्यांच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळ विकण्याच्या रकमेवरून त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे पितळ उघडे पडले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी बाळाच्या पित्याला अटक केली, तर आईसह अन्य दोन महिलांवर गुन्हा नोंदवला आहे.

रविवारी मडगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार उघडकीस आला. रेल्वे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांनी सांगितले, बेल्लारी येथील हे दाम्पत्य (नाव उघड केलेले नाही.) रविवारी आपल्या बाळाला घेऊन मडगाव स्थानकावर आले होते. वास्को येथील एका कंत्राटदाराने हे बाळ विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पत्नी हे बाळ विकत घ्यायला आली होती. यात अन्य एका मध्यस्थी महिलेचा हात असल्याची माहिती त्यांनी दिली.बेल्लारी येथील हे दाम्पत्य गरीब असून आठ महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला होता.

दाम्पत्याला हवे होते 3 लाख रुपये

या बाळाची आपण 80 हजार रुपये किंमत देते, असे त्या महिलेने सांगितले. मात्र, बाळाचे तीन लाख रुपये हवेत, असा हट्ट त्या दाम्पत्याने धरला. यावरून त्यांच्यात वाद वाढत गेला. त्याचवेळी तेथून जात असलेल्या एका पोलिसाच्या कानी हा वाद पडल्याने त्याने वरिष्ठांना त्याची माहिती दिली. त्या चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा नोंद केला. ही कारवाई सुरू असतानाच बाळाच्या आईला मिरगीचा झटका आल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असून बाळही तिच्याकडेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT