Amona-Bicholim Sand deposi Prohibited law Dainik Gomantak
गोवा

Goa News: आमोणे-डिचोलीतही बेधडकपणे रेतीउत्‍खननचे ‘रात्रीस खेळ चाले’

Goa News: कारवाई टाळण्यासाठी अंधाराचा फायदा; तालुक्‍यात अन्‍य ठिकाणीही व्‍यवसाय

दैनिक गोमन्तक

Goa News: कायद्याने बंदी असतानाही साखळीतील आमोणे येथील मांडवी नदीपात्रात बेधडकपणे रेतीउत्‍खनन सुरूच आहे. कारवाई टाळण्यासाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा बेकायदा व्यवसाय चालत आहे. कारवाई होत नसल्याने रेतीव्यावसायिकांना रान मोकळे मिळाले आहे. दरम्यान, आमोणेसह डिचोली तालुक्यातील अन्य भागांतही बेकायदा रेती काढली जातेय. दिवसभर नदीच्या काठी नांगरून ठेवण्यात येणाऱ्या रेतीवाहू होड्या काळोख पडताच नदीच्‍या पात्रात घिरट्या घालताना दिसून येतात.

रात्री रेतीचा उपसा करताना सरकारी यंत्रणेला सुगावा लागणार नाही याची संबंधीत रेतीव्यावसायिकांकडून ‘व्यवस्थित’ काळजी घेण्यात येते. रात्रभर रेतीउत्खनन परस्पर वाहतूक रात्रीच करण्यात येते. काही व्यावसायिक तर रेती नदीच्‍या काठापासून लांब ठिकाणी शेतजमिनीत साठवून ठेवतात. अशा लोकांवर कोणतीच कारवाई होत असल्‍याबद्दल आश्‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

अन्‌ रेतीमाफियांना झाले रान मोकळे!

डिचोलीचे तत्कालीन मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी तालुक्यातील आमोणेसह अन्य भागांतील बेकायदा रेतीव्यवसायाविरोधात धडक मोहीम हाती घेतली होती. खाण आणि भूगर्भ खात्याच्या सहकार्याने त्यांनी अधूनमधून धाडसत्रही सुरू ठेवले होते. धाडीवेळी जप्त करण्यात आलेला रेतीसाठा पुन्हा नदीच्‍या पात्रात टाकण्यात येत होता. या अधूनमधून होणाऱ्या कारवाईमुळे तालुक्यातील रेतीमाफियांची झोप उडाली होती. दरम्‍यान, वर्षापूर्वी मामलेदार पंडित यांची बदली झाल्यानंतर रेतीउत्खननाविरोधातील कारवाई बंद झाली आणि रेतीमाफियांना पुन्हा एकदा रान मोकळे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT