Amit Shah Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: उद्या अमित शहा येणार गोवा दौऱ्यावर

शहा तीन रॅलींमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराणे आता जोर धरला आहे. भाजप आपली सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र, आता केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Amit Shah) राज्यात भाजपचा प्रचार करणार आहेत. ते रविवारी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. (Amit Shah Goa Electiion News)

रविवारी शहा तीन रॅलींमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते फोंडा येथील रॅलीला सायंकाळी 4:30 वाजता संबोधित करतील. पुढे शहा सावर्डे येथे 6:30 वाजता होणाऱ्या रॅलीत सहभागी होतील आणि त्यांची शेवटची रॅली वास्को (Vasco) येथे रात्री 8 वाजता पार पडेल.

या सर्व रॅली कोविड नियमावलीचे पालन करूनच आयोजित केल्या जातील, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत बोलताना तानावडे म्हणाले होते की , निवडणूक आयोगाने (Election Commission) जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून मोदी, शहा आणि पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते गोव्यात पक्षाच्या प्रचार करतील.

आगामी काळात भाजपचे अनेक मोठे नेते गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. याबद्दल तानवडे यांनी माहिती दिली होती. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि स्मृती इराणी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा; भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सहप्रभारी जी. किशन रेड्डी आणि दर्शना जरदोश हे गोव्यातील पक्षाच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT