Amit Shah Goa visit Dainik Gomantak
गोवा

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Amit Shah Goa visit September 6: ६ सप्‍टेंबरला गोव्‍यात आल्‍यानंतर शहा विधानसभा निवडणूक रणनीतीच्‍या अनुषंगाने मंत्री, आमदार आणि गाभा समितीसोबत बैठका घेणार असून, त्‍यानंतरच भाजप पुढील दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेले दोन दिवस दिल्लीत असलेले भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक रविवारी सायंकाळी गोव्‍यात परतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्‍यांची बैठक झाली नाही. परंतु, भाजप भवनच्‍या उद्‍घाटनानिमित्त ६ सप्‍टेंबरला गोव्‍यात आल्‍यानंतर शहा विधानसभा निवडणूक रणनीतीच्‍या अनुषंगाने मंत्री, आमदार आणि गाभा समितीसोबत बैठका घेणार असून, त्‍यानंतरच भाजप पुढील दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

गोव्‍यात पोहोचल्‍यानंतर ‘गोमन्‍तक’शी बोलताना दामू नाईक म्हणाले, की रविवारी माझी गृहमंत्री शहा यांच्याशी भेट झाली नाही. प्रदेश भाजपच्‍या नव्‍या भवनच्‍या उद्‍घाटनासाठी ते ६ सप्‍टेंबरला गोव्‍यात येत आहेत. त्‍यावेळी ते मंत्री, आमदारांसह सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत.

त्‍यावेळी विधानसभा निवडणुकीच्‍या रणनीतीबाबत त्‍यांच्‍याशी सविस्‍तर चर्चा होईल. दोन दिवसांच्‍या दिल्लीत दौऱ्यात मी पक्षाध्यक्ष नितीन नवीन आणि राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्‍याशी याबाबत चर्चा केली, असे दामू नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

राज्‍यात सलग चौथ्‍यांदा सरकार स्‍थापन करण्‍यासाठी भाजपच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाने कंबर कसली असून, त्‍यासाठीच बी. एल. संतोष यांनी दामू नाईक यांच्‍यासोबत शनिवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक घेऊन पुन्‍हा एकदा राज्‍यातील स्‍थितीचा आढावा घेतला.

गोव्‍यातील युवा वर्ग आणि तळागाळातील जनतेच्‍या संपर्कात राहून त्‍यांचे प्रश्‍‍न, समस्‍या समजून घ्‍या आणि सरकारी पातळीवरून ते तत्‍काळ निकाली काढा, अशा सूचना संतोष यांनी दामू नाईक यांना केल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्‍या सेवा संकल्‍प अभियानाच्‍या निमित्ताने दिल्लीत गेलेल्‍या दामू नाईक यांनी शनिवारी नितीन नवीन, बी. एल. संतोष यांच्‍यासह इतर वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या गाठीभेट घेत त्‍यांच्‍याशी चर्चा केली. दिल्लीबाहेर असलेले गृहमंत्री अमित शहा दिल्लीत परतल्‍यानंतर दामू नाईक यांच्‍याशी गोवा विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने चर्चा करणार होते.

त्‍यामुळे दामू नाईक यांना शनिवारी दिल्लीतच थांबण्‍याची सूचना केंद्रीय नेतृत्‍वाने केली होती. परंतु नाईक यांची शहा यांच्याशी भेट होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर संतोष यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्‍यांच्‍याशी चर्चा केली, असेही सूत्रांनी सांगितले.

संघटन सचिवांनी केलेल्‍या सूचना

देशभरातील युवावर्गाकडून गेल्‍या काही दिवसांपासून सरकारच्‍या काही धोरणांना विरोध केला जात आहे. भाजपविरोधी वातावरण निर्माण होत असल्‍याने युवावर्गाचे प्रश्‍‍न, समस्‍या समजावून घ्‍या आणि सरकारी पातळीवरून त्‍यावर तत्‍काळ तोडगा काढा.

भाजप कार्यकर्त्यांच्‍या माध्‍यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजना त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचतात की नाही, याचा आढावा घ्‍या.

गत कार्यकाळात भाजपच्‍या ज्‍या मंत्री, आमदारांची कामगिरी खराब राहिली आहे, त्‍यांच्या मतदारसंघांत नव्‍या चेहऱ्यांचा शोध घ्‍या.

पक्षाच्‍या सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्‍या मैदानात उतरवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT