Amit Shah In Go Dainik Gomantak
गोवा

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांताक्रूझ येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या ‘म्हजे घर योजना’ (Mhaje Ghar Yojana) च्या भव्य सोहळ्यात उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केलं.

Sameer Amunekar

Amit Shah In Goa

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (4 ऑक्टोबर) गोव्यातील सांताक्रूझ येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या ‘म्हजे घर योजना’ (Mhaje Ghar Yojana) च्या भव्य सोहळ्यात उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केलं. भाषणादरम्यान बोलताना अमित शहांनी गोव्याबाबत बोलताना मिश्किलपणे एक भाष्य केलं.

भाषण उरकत घेत अमित शहा यांनी "सायंकाळी गोव्याचा वेगळाच मूड असतो, त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही,” असं म्हणत शहांनी आपल्या भाषणाचा शेवट हलक्याफुलक्या अंदाजात केला.

अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले, "गेल्या १५ वर्षांपासून मी गोव्यात येत आहे. दिवसेंदिवस या राज्याचा होत असलेला विकास माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. विकसित गोवा पाहण्यासाठी २०४७ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. २०३६-३७ पर्यंत गोवा विकसित राज्य बनेल, असा मला ठाम विश्वास आहे."

ते पुढे म्हणाले, “‘म्हजे घर योजना’च्या माध्यमातून गोव्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळावे, हा राज्य सरकारचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयावर काम करत आहे. गोवा हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य असून भविष्यात ते विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल.”

यावेळी शहांनी नागरिकांना स्वदेशीचा संदेशही दिला. “या दिवाळीत परदेशी वस्तूंचा वापर टाळा आणि स्थानिक भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्या,” असं आवाहन त्यांनी गोवेकरांना केलं.

कार्यक्रमाच्या शेवटी शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, तसेच इतर मान्यवरांसोबत संवाद साधत ‘म्हजे घर योजना’च्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केलं

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. शहांच्या या दौऱ्यामुळे गोव्यातील विकास योजनांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT