Amit Patkar, Manikrao Thakare Dainik Gomantak
गोवा

Khapreshwar Porvorim: 'ही कृती जनभावना दुखावणारी', 'मंदिर न हटवता झाले असते काम'! 'खाप्रेश्वर'वरून पाटकर, ठाकरेंचे टीकास्त्र

Amit Patkar: पर्वरी येथील श्रीदेव खाप्रेश्वर मंदिराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा काँग्रेस पक्ष निषेध करतो असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली.

Sameer Panditrao

Khapreshwar Temple Porvorim Dispute

पणजी: पर्वरी येथील श्रीदेव खाप्रेश्वर मंदिराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा काँग्रेस पक्ष निषेध करतो. खाप्रेश्वराचे मंदिर जिथे होते, तिथेच उभे राहायला हवे. लोकांनी याबाबत आवाज उठवायला हवा, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली.

रविवारी सकाळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेन शिरोडकर आणि इतर नेत्यांनी पर्वरी येथील हटविण्यात आलेल्या श्री खाप्रेश्वर मंदिराच्या ठिकाणी हजेरी लावली.

त्यांनी मंदिराशेजारी असलेल्या वडाच्या झाडाच्या उर्वरित पारंब्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अमित पाटकर यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, की राखणदार खाप्रेश्‍वराची सीमा हटवण्याचा ‌अधिकार कोणालाच नाही. येथील देव खाप्रेश्वराचे मंदिर अन्यत्र उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

उड्डाण पुलासाठी मंदिर हटवताना तेथील समिती आणि भाविकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. भल्या पहाटे देवाची मूर्ती मूळ जागेवरून हलवण्याची कृती जनभावना दुखावणारी आहे.

मंदिर न हटविताही झाले असते काम

सुमारे दोनशे वर्षांपासून खाप्रेश्वर देवस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय होता आणि मंदिराला हात न लावता देखील उड्डाण पुलाचे काम झाले असते. काँग्रेसचा विकासाला विरोध नाही; पण लोकांच्या आस्थेचा विचार करायला हवा, असे मत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT