Vishwajeet Rane Dainik Gomnatak
गोवा

ई-मेल प्रकरणाबाबत अमित पाटकर यांचा राणेंवर घणाघात

गोवा ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही; अमित पाटकर

दैनिक गोमन्तक

पणजी: नगरनियोजन व वन खात्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्या आपल्या ई-मेलवर पाठवाव्यात या नगरनियोजन व वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या आवाहनाला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. गोवा ही कोणाची खासगी मालमत्ता नसून सरकारी कामासाठी खासगी ई-मेल कसे वापरले जाऊ शकतात? असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

(Amit Patkar accuses vishwajeet Rane over e-mail case)

नगरनियोजन खात्याच्या मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या खासगी ई-मेलवर पहिल्याच दिवशी 35 तक्रारी आल्याची माहिती राणे यांनी ट्विट करत दिली होती. याबद्दल त्यांनी जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवादही दिले होते. मात्र, आता यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवत सरकारी कामकाजासाठी खासगी ई-मेल का वापरले जावेत असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारी कामकाजाचा आव आणत विश्वजीत राणे हे आपल्या खासगी ई-मेलवर तक्रारी मागवत आहेत हे कायदेशीरदृष्ट्या चूक असून ज्यांना तक्रारी करायच्या आहेत, त्यांनी त्या पोलिसांत करणे आवश्यक आहे. तरच याचा सखोल तपास होऊ शकतो, अन्यथा नाही असेही पाटकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT