AAP Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

अमित पालेकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार : राहुल म्हांबरे

'आप'ला विजयाचा विश्वास

दैनिक गोमन्तक

आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक आणि म्हापसा उमेदवार राहुल म्हांबरे यांनी मंगळवारी सांगितले की, पक्षाला विजयाची पूर्ण खात्री आहे आणि आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर (Amit Palekar) लवकरच गोव्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

40 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत (Election 2022) 78.94 टक्के मतदान झाले. ही सत्ताविरोधी मोठी लाट आहे, यावेळी गोवेकर परिवर्तनासाठी बाहेर पडले अस म्हांबरे यांनी नमूद केले

"आप गेल्या पाच वर्षांपासून तळागाळात जाऊन काम करत आहे, आणि गेल्या दीड वर्षात आमचे सदस्य कोरोना काळात देखील सक्रिय आहेत. मला विश्वास आहे की गोवेकरांनी आमच्या कामाची कबुली दिली आहे आणि 'आप'ला (AAP) मतदान केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान लोकांनी आमच्यावर, आमच्या पक्षावर आणि आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत."असे म्हांबरे म्हणाले. (Amit Palekar will be new Chief Minister of Goa Rahul Mhambare)

"आप हा एकमेव पक्ष आहे जो भ्रष्टाचारविरहित सरकार बनविण्यास सक्षम आहे, शिक्षण आणि आरोग्य पायाभूत सुविधांचा चेहरा बदलण्यास सक्षम आहे आणि आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे शासन मॉडेल लागू करण्यास सक्षम आहे".असे त्यांनी सांगितल

"आम्ही सातत्याने सामन्यांसाठी काम करत आहोत आणि आम्ही गोव्याच्या जनतेसाठी काम करत राहू. ही निवडणूक शेवट नाही, ही एक सुरुवात आहे. आम्ही बहुमताने जिंकू आणि आम्ही आमच्या लोकांची बाजू मांडू . गेल्या पाच वर्षांत केवळ 'आप'नेच विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावली आहे. 'आप' निवडून आल्यास आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू." असे ते म्हणाले.

"या निवडणुकीतही अनेकांनी पैसा आणि बळाच्या जोरावर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. याला कंटाळून लोक बाहेर पडले आणि त्यांनी परिवर्तनासाठी मतदान केले. गोव्याच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून त्यांनी बदलासाठी मत दिले." असे आप'चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर म्हणाले,

ते पुढे म्हणाले, "निवडणुकीच्या दिवशीही लोकांनी 'आप'ला आशीर्वाद दिला आणि पाठिंबा दिला. 'आप' हा एकमेव पक्ष आहे जो स्थिर सरकार देऊ शकतो. 'आप' गोवा आणि इथल्या लोकांसाठी लढत राहील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: तपासणीला गेले अन् 'माल' घेऊन आले! कैद्यांचा गांजा तस्करीचा कट गोवा पोलिसांनी हाणून पाडला; 344 ग्रॅम गांजा जप्त

RO RO Ferry: कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी घेणार आणखी 2 थांबे; प्रवाशांसाठी मोठी सुविधा

Margao Municipality Recruitment Scam: मडगाव नगरपालिकेत 'नातेवाईक' भरती? 11 जागा परस्पर भरल्याचा आमदार सरदेसाईंचा खळबळजनक आरोप; सरकारला धरले धारेवर

Goa Escort Service Fraud: "गोव्यात दलालांची दादागिरी चालणार नाही!" मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा; 512 संशयास्पद वेबसाईट केल्या ब्लॉक

Galjibag Marine Sanctuary Goa: कासवांना मिळणार हक्काचं घर! गालजीबाग येथे सागरी अभयारण्य जाहीर, वनमंत्री राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT