Amit Palekar Aam Aadmi Party's CM Candidate Dainik Gomantak
गोवा

अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

अरविंद केजरीवालांकडून भंडारी समाजाच्या चेहऱ्याला प्राधान्य

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. अमित पालेकर हे गोव्यात मुख्यमंत्रीपदाचे आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील असं अऱविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. गोव्यात काही पक्षांनी आपली सत्ता पैशाच्या माध्यमातून बनवली आहे. मात्र गोमंतकीय जनता त्याला कंटाळली आहे. त्यामुळेच दिल्लीसारखाच विकास गोव्यात करण्यासाठी आम आदमी पार्टी गोव्यात दाखल झाली आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. (AAP CM Candidate News Update)

गोव्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नवा चेहरा असेल. एक अशी व्यक्ती जी गोव्यावर प्रेम करते, जी गोव्यासाठी आपलं जीवन देऊ शकते, अशी व्यक्तीच गोव्याची मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावी. गोव्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सुशिक्षित असेल, समाजाची सेवा करणारा असावा, आणि प्रामाणिकही असावा, असंही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलं आहे.

गोव्यात (Goa) भंडारी समाज सर्वात मोठा आहे, मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आहे. गोवा मुक्त झाल्यापासून केवळ एकदाच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद (CM) मिळाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक अन्याय झाल्याची भावना आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण करतो असा आरोप होतोय, मात्र आम्हाला प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे भंडारी समाजाचा उमेदवारच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT