Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'माझ्‍या नेत्‍यांना गोव्‍यात आणतो, काँग्रेसने त्‍यांच्‍या आणावे'; युतीबाबत बोलण्‍यास ‘आप’ची तयारी, पालेकरांची स्पष्टोक्ती

Goa AAP Congress Alliance:विरोधी पक्षांची युती होणार का, असे विचारले असता पालेकर म्‍हणाले, ते सर्व इतर पक्षांवर अवलंबून आहे. मात्र, युती करायची झाल्‍यास आजच सर्वांनी एकत्र येऊन बोलणी करायला पाहिजे.

Sameer Panditrao

मडगाव: भाजपला हरविण्‍यासाठी सर्व विरोधकांनी गोव्‍यात एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. या लोकभावनेचा कदर करून आम आदमी पार्टी तशी युती करण्‍यास तयार आहे. पण दुसऱ्या पक्षांची तशी तयारी आहे का?

उगाच आम्‍हाला भाजपची बी टीम म्‍हणून हिणवण्‍यापेक्षा काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी युतीसाठी त्‍यांची तयारी आहे का, हे स्‍पष्‍ट करावे. जर त्‍यांना पाहिजे तर युतीची बोलणी करण्‍यासाठी मी आमच्‍या केंद्रीय नेत्‍यांना उद्याही गोव्‍यात बोलावण्‍यास तयार आहे. काँग्रेसची तशी तयारी आहे का? असा सवाल ‘आप’चे गोवा प्रदेशाध्‍यक्ष अमित पालेकर यांनी केला.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्‍यांनी, आज तुमच्‍या कार्यक्रमातून मी इतर पक्षांसमोर हा युतीचा प्रस्‍ताव मांडतो. मात्र, युती करायची असेल तर ती आताच करायला पाहिजे. निवडणूक ताेंडावर येऊन शेवटच्‍या क्षणाला युती केली तर त्‍याचा काहीही फायदा होणार नाही.

गोव्‍याबद्दलचा जो काही निर्णय घ्‍यायचा आहे तो आमच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाने गोवा युनिटवर सोपविला आहे. आता विराेधी पक्ष पुढे येतात की नाही ते त्‍यांनी ठरवावे, असे पालेकर म्‍हणाले. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या फेसबुक, यू-ट्यूब व इन्‍स्‍टाग्रामवर ती उपलब्‍ध आहे.

भविष्‍यात सर्व विरोधी पक्षांची युती होणार का, असे विचारले असता पालेकर म्‍हणाले, ते सर्व इतर पक्षांवर अवलंबून आहे. मात्र, युती करायची झाल्‍यास आजच सर्वांनी एकत्र येऊन बोलणी करायला पाहिजे. कोणत्‍या मतदारसंघात कोण लढणार हे आताच ठरवून त्‍याप्रमाणे काम सुरू करण्‍याची गरज आहे. तसे झाले नाही तर गोव्‍यातील चाळीसही मतदारसंघात आम आदमी पक्ष आपले उमेदवार उभे करण्‍यासाठी सक्षम आहे त्‍यादृष्‍टीने आमचे प्रयत्‍न सुरू आहेत.

जेनिटोशी माझे फक्‍त व्‍यावसायिक संबंध

रामा काणकोणकर हल्‍ला प्रकरणात अटक केलेल्‍या जेनिटो कार्दोज याचे कधीकाळी मी वकीलपत्र घेतले होते म्‍हणून भाजपच्‍या ट्रोल आर्मीकडून माझ्‍याविरोधात व्हॉट्‌सॲप मॅसेजीस फिरविले जातात. इतर पक्षाचेही काही लोक असे मॅसेजीस फॉरवर्ड करण्‍यासाठी पुढे आले आहेत. जेनिटो याच्‍याशी माझे जे संबंध होते ते केवळ व्‍यावसायिक स्‍वरूपाचे होते. त्‍याच्‍याशी माझे राजकीय संबंध कधीही नव्‍हते, असे अमित पालेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

SCROLL FOR NEXT