Sudin Dhavalikar controversy Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Pooja Naik job scam: या कृतीवर आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी तीव्र टीका केली आहे

Akshata Chhatre

फोंडा: पूजा नाईक नोकरी घोटाळा प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण गोव्यात शिगेला पोहोचले आहे. वीजमंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर झालेल्या आरोपांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी रविवारी (दि.१६) फर्मागुढी येथील कटमगाळ दादा महाराज आणि मडकईतील देवी नवदुर्गा मंदिरात गाऱ्हाणे घातले. तर, या कृतीवर आता आम आदमी पक्षाचे (AAP) गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी तीव्र टीका केली आहे.

समर्थकांनी घातले 'शिक्षा' करण्याची मागणी करणारे गाऱ्हाणे

रविवारी मगोपचे कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने कटमगाळ दादा आणि देवी नवदुर्गा मंदिरात जमले होते. त्यांनी ढवळीकर यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी देवाकडे केली.

"ज्यांनी समाजातील कमकुवत घटकांना मदतीचा हात देऊन त्यांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला, ते मगोपचे नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर जॉब स्कॅमप्रकरणी खोटे आरोप करणाऱ्यांना तूच कडक शिक्षा कर," असे गाऱ्हाणे कार्यकर्त्यांनी देवासमोर घातले.

पालेकरांचे आव्हान; "नरको टेस्ट करा!"

ढवळीकर यांच्या समर्थकांनी देवस्थानांचा वापर राजकीय संरक्षणासाठी केल्याबद्दल 'आप'चे अध्यक्ष अमित पालेकर यांनी सडकून टीका केली आहे. पालेकर म्हणाले की, राजकीय संरक्षणासाठी पवित्र देवस्थानांचा गैरवापर करणे हा श्रद्धेचा अपमान आहे. भाजप नेते वारंवार राजकीय फायद्यासाठी गोव्यातील देव-देवतांचा अनादर करत आहेत.

कटमगाळ येथील दादा महाराज असो किंवा देवी नवदुर्गा, देवाला कोणी काय केलेय याची पूर्ण माहिती आहे. वीजमंत्री जर का निर्दोष असतील तर त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने देवीच्या मंदिरात येऊन आत्तापर्यंत कधीही पैसे न घेतल्याची, पैसे घेऊन कुणालाही नोकरी न दिल्याची कबुली देवीसमोर द्यावी, कार्यकर्त्यांकडून हा संदेश द्यावा मी स्वतः देखील उपस्थित राहीन असे पालेकर म्हणाले आहेत.

पालेकर यांनी सुदिन ढवळीकरांना आव्हान दिले, "जर तुम्ही खरोखरच निर्दोष असाल, तर पूजा नाईकसोबत नार्को टेस्ट करा." या सोबतच त्यांनी भाजपच्या मंत्र्यांची नार्को टेस्ट व्हावी असे आव्हान दिले आहे. पालेकर पुढे म्हणाले, "जो व्यक्ती खऱ्या अर्थाने निर्दोष असतो, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन देवासमोर शपथ घेतो. सुदिन ढवळीकरांनी लपवण्यासाठी काही नसेल, तर त्यांनी ते करून दाखवावे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT