108 ambulance Dainik Gomantak
गोवा

Ambulance Issue: हाकेच्या अंतरावर यायला ‘108’ ला तब्‍बल पाऊण तास!

काल दिवसाढवळ्या मडगाव येथील कुंदे पेट्रोलपंपाजवळ एका वयोवृद्ध नागरिकाला स्वयंअपघात होऊन जखमी होण्याचा प्रकार घडला होता.

Shreya Dewalkar

फातोर्डा: आपत्कालीन सेवेसाठी तत्पर असलेल्या सरकारच्‍या 108 रुग्णवाहिकेला मडगाव शहरातील हाकेच्या अंतरावर यायला तब्ब्ल 45 मिनिटांचा कालावधी लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(ambulance issue in goa)

अशा प्रकारामुळे या सेवेचा नागरिकांना काय फायदा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. काल दिवसाढवळ्या मडगाव येथील कुंदे पेट्रोलपंपाजवळ एका वयोवृद्ध नागरिकाला स्वयंअपघात होऊन जखमी होण्याचा प्रकार घडला होता. त्‍या जखमी वृद्धाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या एकाने 108 रुग्णवाहिलेला तातडीने येण्यासाठी फोन केला होता.

ही रुग्णवाहिका थांबण्याचे ठिकाण आणि अपघात घडण्याचे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे. तरीसुद्धा या रुग्‍णवाहिकेला या ठिकाणी यायला मर्यादित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागला होता. अशामुळे या सेवेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघातग्रस्‍तांचे प्राण यामुळे कसे वाचतील, असाही प्रश्‍‍न विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT