Amazing Goa Global Business Summit 2024 Piyush Goyal Speech Dainik Gomantak
गोवा

Amazing Goa: गोव्यातील 23 औद्योगिक क्षेत्रांत गुंतवणुकीची मोठी संधी; जागतिक परिषदेत सरकारने मांडला प्लान

Amazing Goa Global Business Summit 2024 Piyush Goyal Speech: गोवा माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळ सध्या राज्यात 11 हजार 185 चौरस मीटर भूखंडावर डेटा सेंटर उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे.

Manish Jadhav

Amazing Goa Global Business Summit 2024:

पणजी: केंद्र आणि राज्य सरकार गोव्याला डेटा सेंटर, उच्च दर्जाचे सेमी कंडक्टर चिप्स डिझाईन व उत्पादन, उच्च गुणवत्तेची इलेक्ट्रॉनिक्स व ऑटोमोबाईल उत्पादने यासारख्या हायटेक उद्योगांसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून विकसित करण्याच्या शक्यतेवर काम करत आहे, असे वाणिज्य तथा उद्योगमंत्री पीयूष गोयल म्हणाले. बांबोळी येथे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या ‘ॲमेझिंग गोवा’ या जागतिक परिषदेच्या उद्‍घाटन सत्रात आभासी पद्धतीने ते बोलत होते.

गोवा माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळ सध्या राज्यात 11 हजार 185 चौरस मीटर भूखंडावर डेटा सेंटर उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यासाठी एकूण प्रकल्प खर्च, आवश्यक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचे पुरवठादार ओळखण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, परिषदेचा उद्देश गोव्यातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून देण्यासोबतच राज्याला नवीन गुंतवणूक क्षेत्र बनविणे आहे. गोवा कृत्रिम बुद्धिमत्ता, औषध निर्मिती, नवीकरणीय ऊर्जा आणि आयुर्वेद यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक संधींचा शोध घेण्यास उत्सुक आहे. गोव्याला एक व्यापार केंद्र म्हणून मजबूत करण्यासाठी सरकार सतत व्यवसाय सुलभता सुधारण्यावर, व्यापारसुलभ धोरणे प्रोत्साहन देण्यावर, राहणीमान उंचावण्यावर आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT