गोवा

Ponda: राखी प्रकरण! अखेर आल्मेदा शाळेच्या मुख्याध्यापिकेने मागितली पालकांची माफी, बजरंग दलाचा घेराव

याप्रकरणी आज बजरंग दलाने मुख्याध्यापिका यांना घेराव घातला.

Pramod Yadav

Almeida school Ponda: फोंडा तालुक्यातील आल्मेदा शाळेत विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणानिमित्त हातावर बांधण्यात आलेली राखी काढण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला होता. शाळेत विद्यार्थ्यांना हातावरील राखी काढायला लावली गेल्याचे समोर येताच पालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

याप्रकरणी आज बजरंग दलाने मुख्याध्यापिका यांना घेराव घातला. त्यानंतर अखेर मुख्याध्यापिका यांनी पालकांची माफी मागितली आहे.

पालकांना 31 ऑगस्ट रोजी पाठवलेल्या नोटीसमागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. भविष्यात आम्ही विद्यार्थ्यांना घरात हातावर बांधलेली राखी बांधून येण्याची परवानगी दिली जाईल. असे स्पष्टीकरण शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका यांनी दिले आहे. याबाबतचा संदेश त्यांनी पालकांच्या ग्रुपवरती पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, त्यापूर्वी बजरंग दलाच्या वतीने मुख्याध्यापिका यांना घेराव घालण्यात आला. विद्यार्थ्यांना राखी बांधून शाळेत येऊ नये अशी सूचना केल्याप्रकरणी जाब विचारला.

फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या नावाने संदेश पाठवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येतांना हातात राखी न बांधण्यास सांगण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी हातात राखी बांधून आलेल्यांना त्या काढण्यास भाग पाडण्यात आले.

शाळेने सर्व पालकांची माफी मागितली पाहिजे. तसेच यात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रणरागिनी संघटनेतर्फे करण्यात आली होती. अखेर शाळेने पालकांची माफी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT