Morjim  Dainik Gomantak
गोवा

Morjim News : पारंपरिक रेती व्यवसायासाठी परवानगी द्या; परराज्यातील रेतीला विरोध

Morjim News : पोरस्कडे-न्हयबागमधील व्यावसायिकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News : मोरजी, पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन्ही नद्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने रेती व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर परवानगी लवकरात लवकर सरकारने द्यावी.

तोपर्यंत परराज्यातील रेती वाहतूक करू नये, अशी जोरदार मागणी पोरस्कडे-न्हयबाग येथील पारंपरिक रेती व्यावसायिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी एकनाथ तेली, रुपेश मांजरेकर, सुरज तेली, दीपक हळदळकर, सोमा मुळगावकर, ज्ञानेश्वर हळदणकर, आदिती हे व्यावसायिक उपस्थित होते.

रुपेश मांजरेकर म्हणाले, तेरेखोल नदीत आम्ही पारंपरिक पद्धतीने रेती व्यवसाय करतो. कारण आम्हांला नोकरी नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे कर्ज काढून होड्या विकत घेतल्या. घरातील सदस्यांचे दागिनेही गहाण ठेवून हा व्यवसाय आम्ही पारंपरिक पद्धतीने करत असतो.

परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णपणे हा व्यवसाय बंद पडल्यामुळे आमच्यावर उपासमारी आलेली आहे. सरकारने लवकरात लवकर कायदेशीर परवाने आम्हांला देऊन पारंपरिक पद्धतीने रेती व्यवसाय सुरू करण्यास संमती द्यावी. तसेच परराज्यातून येणारी रेती वाहतूक बंद करावी आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

सूरज तेली म्हणाले, जोपर्यंत आमचा पारंपरिक रेती व्यवसाय सरकार सुरू करत नाही, तोपर्यंत परराज्यातील रेती राज्यात आणू नये. सरकारने आमच्याकडे मागण्यांचा विचार करावा.रेती व्यावसायिकांची मागणी आहे, की सरकारने लवकरात लवकर पारंपरिक पद्धतीने रेती काढण्यासाठी परवाने द्यावेत.

ते परवाने घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र आमच्यातील कोणीही बेकायदेशीर रेती व्यवसायात गुंतलेला नाही. आम्हांला सहकार्य करून पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी हातभार लावावा.

पेडण्यात २०० पारंपरिक रेती व्यावसायिक

एकनाथ तेली म्हणाले, पारंपरिक व्यवसाय कायद्यानुसार चालू आहे. हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी सरकारही वेळोवेळी सहकार्य दिले पाहिजे. आमच्या मागण्या आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासमोर मांडल्या आहेत.

तेही सरकार दरबारी प्रयत्न करून आम्हांला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. शापोरा आणि तेरेखोल नदीत किमान २०० व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने रेती व्यवसाय करण्यास तयार आहेत. त्या सर्वांना लवकरात लवकर कायदेशीर परवाने देऊन हा व्यवसाय सुरू करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT