Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

केपे पंचायत प्रभाग फेररचनेत घोळ झाल्याचा आरोप

असोल्डा पंचायतीचे पंच मनोज नाईक यांनी आपल्या प्रभाग सहामध्ये बऱ्याच चुका केल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

केपे: पंचायत निवडणुकांसाठी प्रभाग फेररचना लागू झाली असून यासंबंधी लोकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरू झाले आहे. केपे मामलेदार कार्यालयात बरेच पंच सदस्य व सरपंच या फेर प्रक्रियाविषयी तक्रारी घेऊन यायला लागले आहेत. या फेररचनेत बराच घोळ केल्याचा आरोप काही माजी सरपंचांनी केला आहे.

विधानसभा निकालापूर्वी प्रभाग रचनेचे काम पूर्ण करायचे असल्याने सध्या केपे मामलेदार कार्यालात सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कामाला लागले आहेत.

अवेडे पंचायतीचे माजी सरपंच तसेच विद्यमान पंच माफालदो फर्नांडिस यांनी सांगितले, की या पंचायत क्षेत्रातील सात प्रभागांपैकी सहा प्रभागात बरेच फेरबदल केले असून ते संमजण्यापलीकडे आहेत. एकाही प्रभागात मतदारांची संख्या वाढली नाही की कमीही झालेली नाही, पण जी फेररचना केली आहे ती पूर्णपणे चुकीची असून ती कुणी व का केली आहे हे समजत नाही व यासाठी आम्ही याविषयी साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी चर्चा केली आहे.

असोल्डा पंचायतीचे पंच मनोज नाईक यांनी आपल्या प्रभाग सहामध्ये बऱ्याच चुका केल्याचे सांगितले. या प्रभागात प्रभाग चार व पाचमधील मतदारांना घालण्यात आले आहे तसेच भौगोलिक क्षेत्राप्रमाणे प्रभागांची रचना झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT