Mayem  Dainik Gomantak
गोवा

Mayem : मयेतील मारहाणप्रकरणी सहाही संशयितांना रिमांड

मारहाणीत एका बालिकेसह सातजण जखमी झाल्याची तक्रार डिचोली पोलिसांत

दैनिक गोमन्तक डिजिटल

मये येथील मारहाणप्रकरणी अटक केलेल्या सहाही संशयितांना चार दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे. गुरुवारी या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना रिमांड मंजूर केला.

माल्याच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर अधिकाराच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नाईक गावकर गटातील लोकांनी परब गटातील लोकांना केलेल्या मारहाणीत एका बालिकेसह सातजण जखमी झाल्याची तक्रार डिचोली पोलिसांत करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांविरोधात भादंसंच्या 307 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्यातील सहाजणांना (बुधवारी) सायंकाळीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सहाजणांना अटक केल्याचे समजताच संतप्त बनलेल्या नाईक गावकर गटातील महिला मिळून जवळपास दोनशे लोकांनी रात्री डिचोली पोलिस स्थानक गाठले.

मध्यरात्रीपर्यंत हे लोक पोलिस स्थानकाबाहेरच होते. आमच्या मुलाला झालेल्या मारहाणप्रकरणी परब गटातील लोकांना अटक करा, अशी मागणी महिला करत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT