Aleixo Sequeira | St Francis Xaviers relics Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier's प्रदर्शन यशस्वी करून दाखवणार! मंत्री सिक्वेरांचे आश्वासन

Aleixo Sequeira: ओल्ड गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शनाची सर्व तयारी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्र्वासन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

St Francis Xaviers relics exhibition on 21st November

सासष्टी: ओल्ड गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शनाची सर्व तयारी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्र्वासन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आपण पार्थिव प्रदर्शन आयोजन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. या बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी व चर्चचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही हे प्रदर्शन यशस्वी करून दाखवणार आहोत.

मुख्यमंत्र्यांनी या पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी २००कोटी रुपये खर्च करणार असे सांगितले आहे. त्यापेक्षा जास्त खर्च झाला तरी पैशांमुळे कामे अडणार नाहीत, याची ग्वाही आपण देतो असेही सिक्वेरा म्हणाले.

कुटबण जेटी संदर्भात बोट मालक संघटना व शौचालय कंत्राटदार यांच्यात एकमत झाले असून बोट मालकांना शौचालयासाठी ६.६७ लाख रुपये द्यावे लागतील असेही सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT