All india konkani parishad Dainik Gomantak
गोवा

गडहिंग्लजमध्ये साजरा होणार कोकणी परिषदेचा स्थापना दिवस; ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो प्रमुख पाहुणे

कार्यक्रमासाठी कोकणी साहित्यिक दामोदर मावजो प्रमुख पाहुणे असतील

गोमन्तक डिजिटल टीम

All india konkani parishad: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शनिवारी (दि.08 जुलै) कोकणी परिषदेचा स्थापना दिवस साजरा होणार आहे. 84 व्या स्थापना दिवसासाठी ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोकणी परिषद आणि उजवाड परिवारतर्फे आयोजित हा कार्यक्रम, येथील सेंट अँथणी चर्चच्या सभागृहात होईल. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील कोकणी कार्यक्रम होत आहे. असे साधना शिक्षण संस्थेचे सचिव बारदेस्कर म्हणाले.

उजवाड परिवाराचे लुईस रॉड्रीग्स व साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी गडहिंग्लजमध्ये होणाऱ्या स्थापना दिवसाची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कार्यक्रमासाठी कोकणी साहित्यिक दामोदर मावजो प्रमुख पाहुणे असतील तर, सिंधुदुर्गचे बिशप डॉ. ऑल्वीन बरेट्टो व ज्येष्ठ कोकणी साहित्यिक डॉ. भूषण भावे यांची प्रमुख उपस्थिती असेल असे रॉड्रीग्स आणि बारदेस्कर यांनी स्पष्ट केले.

'सोळाव्या व सतराव्या शतकात विविध कारणांनी गोव्यातील ख्रिस्ती व अख्रिस्ती समाजाचे खानापूर, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगर, कागल या तालुक्यांत स्थलांतर झाले. कोकणी परिषद आणि उजवाड परिवारने एवढा मोठा कार्यक्रम घेण्यासाठी गडहिंग्लजची निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' असे साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी म्हटले आहे.

असे असेल कार्यक्रमाचे स्वरूप

कोकणी परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिला वहिला माधव मंजुनाथ पै जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कोकणी साहित्यिक व माजी खासदार अॅड. उदय भेंब्रे यांना दिला जाणार आहे.

कार्यक्रमात 'घाटमाथ्यावरील कोकणी संस्कृती' या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात आल्फी मंतेरो (पुणे), रोजालीन गोडद (भुदरगड), जे. बी. बारदेस्कर (गडहिंग्लज) सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमात गोव्यातील कलाकार सहभागी होणार असून, ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. अशी माहिती बारदेस्कर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT