Goa Politics|Court Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राजकारण्यांविरुद्धचे सर्व खटले मडगावात

राज्यातील विविध न्यायालयांत राजकारण्यांविरुद्ध दाखल असलेले फौजदारी खटले आता दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: राज्यातील विविध न्यायालयांत राजकारण्यांविरुद्ध दाखल असलेले फौजदारी खटले आता दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खटल्यांसाठी हे विशेष न्यायालय म्हणून नियुक्त केले आहे.

त्यामुळे बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो यांच्यासह इतर राजकारण्यांविरुद्धच्या खटल्यांवरील सुनावणी या न्यायालयात होणार आहे.

विशेष न्यायालय

राजकारण्यांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांवरील सुनावणी लवकर होऊन निर्णय लागावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांना अशा खटल्यांसाठी विशेष न्यायालय नियुक्त करा, असे निर्देश दिले आहेत.

मात्र, गोव्यात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केल्याने आता विशेष न्यायालय म्हणून दक्षिण प्रधान सत्र व जिल्हा न्यायालयाची नियुक्ती केली आहे.

संशयितांमध्ये नाराजीचा सूर

मंत्री बाबूश मोन्सेरात व इतरांविरुद्धच्या पणजी पोलिस स्थानक हल्ला खटल्याची सुनावणी शुक्रवारी पणजी प्रधान सत्र न्यायालयात होणार होती. यावेळी ही सुनावणी न घेता दक्षिण प्रधान सत्र न्यायालयात होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली व त्यांना 31 रोजी सुनावणीस तेथे हजर राहण्याचे निर्देश दिले.

यामुळे या खटल्यातील संशयित अचंबित झाले. आता सुनावणीसाठी मडगावला जावे लागणार असल्याने संशयितांमध्ये नाराजीचा सूर उमटला. या सुनावणीस मोन्सेरात दाम्पत्य उपस्‍थित नव्हते. आजी-माजी आमदार-मंत्र्यांचे खटलेही मडगावात वर्ग केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT