Crime Branch FIR  Dainik Gomantak
गोवा

आलेक्स सिक्वेरा पोर्तुगीज नागरिक असल्याची क्राईम ब्रँचकडे तक्रार

डिमेलो हे राष्ट्रवादी पक्षाचे नुवे मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : नुवे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करीत असलेले माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा हे पोर्तुगीज नागरिक असल्याने, भारतीय संविधानानुसार निवडणूक लढविण्यात अपात्र ठरत आहेत. या विषयी तपास करण्याची तक्रार नुवेचे रहिवाशी असलेले फ्रॅन्की डिमेलो यांनी क्राईम ब्रांच (Crime Branch) विभागाकडे केली आहे.

मात्र या संबंधी सिक्वेरा यांच्याशी संपर्क साधता असता आपण कधीही पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेले नाही. आणि दुसरे म्हणता अशा प्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार नाही, अशी प्रकरणे फक्त केंद्र सरकारचे विदेश व्यवहार मंत्रालय (Ministry) कारवाई करू शकते त्यामुळे या तक्रारीत काहीच अर्थ नाही असे सिक्वेरा म्हणाले.

डिमेलो हे राष्ट्रवादी पक्षाचे नुवे मतदारसंघाचे (constituency) अध्यक्ष आहेत. आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 2000 मध्ये त्यांचा जन्म पोर्तुगीज मधील लिस्बन या ठिकाणी नोंद केलेल्या दाखल्याचा पुरावा आपल्याकडे आहे. तसेच दोन वेळा ते पोर्तुगालमध्ये दौरा करूनही आले आहेत. त्यावेळी त्यांनी पोर्तुगीज पासपोर्टचा वापर केला होता.

त्यांची मालमत्ताही तेथे आहे. या विषयी काही पुरावे गोळा करून आलेक्स सिक्वेरा विरुद्ध गुन्हा अन्वेषण विभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वी त्यांनी 2007 ते 2012 दरम्यान दिगंबर कामत हे राज्याचे मुख्यमंत्री (CM) असताना वीज खात्याचे मंत्री म्ह्णून पद संभाळलेले आहे. पुन्हा ते निवडणूक लढवून स्थानिकांना तसेच राज्यातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

देशाच्या राज्य घटनेनुसार देशाबाहेरील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक (Election) लढवण्याचा अधिकार नाही. अशाने ते पोर्तुगीज (Portuguese) नागरिक असल्यास निवडणुकीसाठी अपात्र ठरत असल्याचे फ्रॅन्की डिमेलो यांनी सांगितले. या विषयी आपण सिक्वेरा यांच्याविरुद्ध आणखी पुरावे गोळा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT