Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : हळदोण्यात दुचाकींच्या डिकीतून मोबाईल चोरणारा आरोपी अखेर गजाआड

म्हापसा पोलिसांनी अन्सारी नारंगी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : हळदोणा येथे तीन दुचाकींच्या डिकी फोडून त्यातील महागडे फोन आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या आरोपीच्या म्हापसा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अन्सारी नारंगी असं या 32 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मडगावच्या राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयिताकडून पोलिसांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोंबुर्फा येथील लिसा डिक्रुझ यांनी 6 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात 4 सप्टेंबर रोजी माससाठी पोंबुर्फा येथील मदर ऑफ गॉड्स चर्चजवळ पार्क केलेल्या तीन दुचाकींची डिकी फोडून चोरी केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. यात तीन महागडे फोन आणि रोख रक्कम चोरल्याची तक्रार देण्यात आली होती. म्हापसा पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला होता.

म्हापसा पोलिसांना या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर यश आलं आहे. पोलिसांनी मूळचा कर्नाटकमधील मात्र सध्या मडगावात हाऊसिंग बोर्ड परिसरात राहणाऱ्या अन्सारी चमनसाब नारंग याला मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपीला कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम मिळून एकूण अंदाजे 45 हजार रुपयांचं सामान हस्तगत करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT