gold purchase muhurat Akshaya Tritiya Dainik Gomantak
गोवा

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीया म्हणजे काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीची उत्तम वेळ

Akshaya Tritiya muhurat:अक्षय तृतीया हा भाग्याचा दिवस मानला जातो. लोकं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी करतात, तुम्हाला सुद्धा सोनं विकत घ्यायचं आहे का?

Akshata Chhatre

best time to buy gold akshaya tritiya: अक्षय तृतीया हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो. यावर्षी अक्षय तृतीया बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. मुळातच अक्षय तृतीया हा भाग्याचा दिवस मानला जातो. लोकं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी करतात, तुम्हाला सुद्धा सोनं विकत घ्यायचं आहे का? पण शुभ मुहूर्त काय चला जाणून घेऊया.

अक्षय तृतीया: बुधवार, ३० एप्रिल २०२५

अक्षय तृतीया पूजा मुहूर्त: सकाळी ५:४२ ते दुपारी १२:१९ पर्यंत

तृतीया तिथी प्रारंभ: २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:३१ वाजता

तृतीया तिथी समाप्त: ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:१२ वाजता

अक्षय तृतीया म्हणजे काय?

'अक्षय' या शब्दाचा अर्थ 'कधीही क्षीण न होणारा' असा आहे. श्रद्धाळू लोकांचा विश्वास असतो की हा दिवस घरात, परिवारात शाश्वत समृद्धी घेऊन येतो. अक्षय तृतीयेला केलेले जप, यज्ञ, पितृ-तर्पण आणि दान-पुण्य यांसारख्या कृतींचे फायदे मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे. भक्तीभावाने केलेले हे कार्य दीर्घकाळ टिकणारे आशीर्वाद, सुख आणि समृद्धी घेऊन येतो अशी लोकांची श्रद्धा आहे.

अक्षय तृतीयेचे महत्त्व

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे अनन्यसाधारण महत्व आहे. अक्षय तृतीयेची एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे सोने खरेदी करणे. या दिवशी सोने खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते असा विश्वास लोकांमध्ये आहे.

आत्ताच्या काळात सोन्याची गुंतवणूक करण्यासाठी आखलेला एक दिवस असंही म्हणता येऊ शकतं. कालांतराने खरेदी कळलंय सोन्याची किंमत वाढते त्यामुळे 'अक्षय' या शब्दाच्या अर्थानुसार कधीही कमी न होणारी ही समृद्धी आहे.

अक्षय तृतीया केवळ एक सण नाही, तर नवीन सुरुवात आणि आध्यात्मिक विकासाचा दिवस आहे. सोने खरेदी करणे असो, पूजा करणे असो किंवा दानधर्म करणे असो, हा दिवस तुमच्या जीवनात चिरस्थायी समृद्धी आणि यश घेऊन येण्याची एक संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT