Akshardham Temple New Jercy America Dainik Gomantak
गोवा

Khandola News : न्यू जर्सी - अमेरिकेत ''अक्षरधाम'' मंदिराचे उद्‍घाटन

परस्परांमध्ये सलोखा ही शांती व प्रेमानेच निर्माण होईल. असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News : खांडोळा, सनातन हिंदू धर्म विश्वस्तरावर पोहोचलेला आहे. समाजाला ईश्वराकडे आकृष्ट करण्याचे, ईश्वराशी जोडण्याचं प्रमुख माध्यम मंदिर आहे. आज जगाला अध्यात्माची खूप गरज आहे. स्वार्थी हेतू मनात ठेवून आपण जगाला जिंकू शकत नाही.

विश्वाला आपलेसे करण्यासाठी प्रेम, अध्यात्म, सर्वसमावेशकतेची गरज आहे. त्यागी वृत्तीनेच सनातन धर्म आजवर शाबूत राहिलेला आहे. या धर्मामध्ये निसर्गसृष्टीलाच देव मानलेले आहे, पूजनीय स्थान दिलेले आहे.

परस्परांमध्ये सलोखा ही शांती व प्रेमानेच निर्माण होईल. असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर राकेश झवेरी (जैन धर्माचे आध्यात्मिक नेता), आमेन साही (उपराजदूत, बरेन), श्रीनिवासन, जोनाथन जॅक्सन, युसुफ अहमद (उपमुख्य मिशन, बहरीन राज्य दूतावास), फिलिप रामोस (न्यूयॉर्क), ॲड्. ब्राह्मीदेवी (अध्यक्ष सत्गुरु फाउंडेशन - गोवा) उपस्थित होते.

न्यू जर्सी अमेरिका येथे स्वामिनारायण संस्थानद्वारे महंत स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली अक्षरधाम हिंदू मंदिर उद्‍घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमसाठी खास ब्रह्मेशानंदाचार्यांना आमंत्रण दिले होते.

स्वामी म्हणाले, अक्षरधाम हिंदू मंदिर म्हणजे स्वामिनारायण संस्थानचे संस्थापक पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांनी या माध्यमातून सुरू केलेली क्रांती आहे. त्यांनी विविध शहरांमध्ये मंदिरे निर्माण करुन जगाला सनातन धर्माची ओळख करून दिली.

हा एक सनातन धर्मासाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण अमेरिकेतील अशा प्रकारचे हे पहिले मंदिर आहे.

या भव्य उद्‍घाटन कार्यक्रमात ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे पावन संत सान्निध्य लाभले. यासाठी स्वामिनारायण संस्थानद्वारे पूज्य स्वामीजींचा विशेष गौरव करण्यात आला.

अमेरिकेत स्वामिनारायण संस्थानच्या माध्यमातून अक्षरधाम हिंदू मंदिर निर्माण केल्याबद्दल पूज्य स्वामीजींनी समस्त भारत देशवासीयांतर्फे तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे शुभेच्छा प्रदान केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT