Akhil Bhartiya OBC Mahasabha Trust Dainik Gomantak
गोवा

OBC Trust: ओबीसी महासभेचा 'गणेशोत्सव' साजरा करण्याचा निर्णय; समाजाच्या हक्कासंदर्भात होणार विचारविनिमय

Ganesh Chaturthi 2024: ओबीसी’ महासभेंतर्गत येणाऱ्या १९ समाजातील समाज बंधू-भगिनी एकत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Ganeshotsav 2024

डिचोली: अखिल भारतीय ‘ओबीसी’ महासभा ट्रस्टतर्फे यंदापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसा निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. घाडीवाडा - आमोणे येथे हा गणेशोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘ओबीसी’ महासभेंतर्गत येणाऱ्या १९ समाजातील समाज बंधू-भगिनींना एकत्रित आणून ‘ओबीसीं’च्या हक्कासंदर्भात विचारविनिमय व्हावा. या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी आयोजन समितीही निवडण्यात आली आहे. अशी माहिती अखिल भारतीय ‘ओबीसी’ महासभा ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव बाळा सावंत, खजिनदार विठोबा घाडी, निमंत्रक पंकज नमशीकर, गणेशोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज वायंगणकर, शिक्षण विभागाचे आत्माराम गावकर, संतोष गावकर, श्रीपाद कुंभारजुवेकर, महिला विभागाच्या नेहारिका नार्वेकर, श्रीजया हळदणकर आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नऊ दिवस साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात धार्मिक विधीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. गणेशोत्सवात स्पर्धांसह भजन, फुगडी आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात देणगी कुपन काढण्यात आले असून समाजातील एक नेते आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते देणगी कुपनांचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती पंकज नमशीकर यांनी दिली.

मंत्री, आमदारांना एकत्रित आणणार

‘ओबीसी’ महासभेतर्फे समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे यापूर्वीच मांडण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसह ओबीसी समाजातील मंत्री, आमदारांना एकाच व्यासपीठावर आणून ‘ओबीसी’च्या मागण्या मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती शशिकांत घाडी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT